आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आता नागपुरात बंद!:नागपूरमध्ये शनिवार-रविवार बाजारपेठा बंद; तर शाळा, महाविद्यालये 7 मार्च पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश; लवकरच अधिकृत घोषणा

नागपूर3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपुरातील बर्डी या मुख्य बाजारपेठेत रविवारी अशी गर्दी होती. - Divya Marathi
नागपुरातील बर्डी या मुख्य बाजारपेठेत रविवारी अशी गर्दी होती.
  • पालकमंत्र्यांच्या बैठकीत झाला निर्णय

राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असताना जिल्हास्तरावर कठोर पावले उचलली जात आहेत. अमरावती आणि पुण्यासह अकोल्याने कोरोनाचे गांभीर्य लक्षात घेता निर्बंधांची घोषणा केलीच होती, त्यात आता नागपूरची भर पडली आहे. नागपुरात शनिवार, रविवार असे आठवड्यातील दोन दिवस बाजारपेठा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नागपूरचे पालकमंत्री नितीन राउत यांनी जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. त्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून लवकरच यासंदर्भात अधिकृत माहिती जारी केली जाणार आहे.

बैठकीत झालेले निर्णय

  • मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या 'मी जबाबदार' मोहिम नागपुरात राबविली जाणार
  • हॉटेल, रेस्तरला 50 टक्के क्षमतेपर्यंत परवानगी असेल, पण रात्री 9 ते सकाळी 6 वाजेपर्यंत ते बंद असतील
  • धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय कार्यक्रम 7 मार्चपर्यंत बंद राहतील
  • मंगल कार्यालये, लॉन, रिसॉर्ट यांना 25 फेब्रुवारीपासून 7 मार्चपर्यंत बंद ठेवण्याच्या सूचना
  • कोव्हिड सेंटर पुन्हा सुरू करणार, चाचण्यांचे प्रमाण वाढवले जाणार
  • नागरिकांनी कुठलेही लक्षण आढळल्यास चाचणी करावी असे आवाहन

एका दिवसात वाढले 4,412 सक्रीय रुग्ण
रविवारी देशभर 13,979 नवीन रुग्ण सापडले आहेत. तर 9,476 रुग्ण बरे झाले आहेत. अर्थातच 4,412 सक्रीय रुग्णांची वाढ झाली आहे. ही वाढ 87 दिवसांत सर्वाधिक आहे. तसेच रविवारी कोरोनामुळे 79 जणांचा मृत्यू झाला. तत्पूर्वी 25 नोव्हेंबर रोजी 7,234 अॅक्टिव्ह रुग्ण वाढले होते. अॅक्टिव्ह किंवा सक्रीय रुग्ण म्हणजे असे रुग्ण की ज्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.

राज्यातील कोरोनाची आकडेवारी...
राज्यात रविवारी 6,971 लोक कोरोना पॉझिटिव्ह सापडले आहेत. 2,417 रुग्ण बरे झाले, तर 35 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला. आतापर्यंत राज्यात 21 लाख 884 लोकांना कोरोनाची लागण झाली. त्यातील 19 लाख 94 हजार 997 लोक बरे झाले. तर 51 हजार 788 लोकांचा जीव गेला. 52 हजार 956 रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत.