आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बदली:नागपूरचे मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांची बदली; राज्य सरकारकडून 8 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

नागपूर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्य सरकारने बुधवारी नागपूर महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यासह ८ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. आता तुकाराम मुंढे यांची राज्य सरकारच्या जल जीवन प्राधिकरणाच्या सदस्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

तुकाराम मुंढे यांच्या जागेवर राधाकृष्णन बी. यांची नियुक्ती करण्यात आल्याचे पत्र राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने पाठवले आहे. विशेष म्हणजे तुकाराम मुंढे यांना मंगळवारी कोरोनाची लागण झाली आहे. मुंढे सध्या गृह विलगीकरणात आहेत. ते गृह विलगीकरणात असतानाच राज्य सरकारने त्यांचे स्थानांतर केल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. मुंढे यांच्या जागी नियुक्ती करण्यात आलेले राधाकृष्णन बी. यांना त्वरित कार्यभार स्वीकारण्याची सूचना स्थानांतर पत्रात करण्यात आली आहे. तुकाराम मुंढे यांच्या कार्यपद्धतीवरून नागपूर महानगरपालिकेत अनेकदा वाद निर्माण झाला होता.