आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागपुरात नात्याला काळिमा:लहान भावाने बहिणीला तिच्या बॉयफ्रेंडसोबत आक्षेपार्ह अवस्थेत पाहिले, प्रकरण लपवण्यासाठी बहिणीने गळा दाबून केली भावाची हत्या

नागपूर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • प्रकरण लपवण्यासाठी मुलीने सांगितली दुसरी गोष्ट

नागपुरातून एक अतिशय धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. येथे एका बहिणीवर आणि तिच्या प्रियकरावर आपल्या लहान भावाची हत्या केल्याचा आरोप आहे. आरोपानुसार, भावाने तिच्या बहिणीला तिच्या प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत पाहिले होते, त्यानंतर मुलीने प्रकरण लपवण्यासाठी भावाला जीवे मारले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भावाची गळा दाबून हत्या करण्यात आली आहे. दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली असून दोघांनीही आपला गुन्हा कबूल केला आहे.

ही घटना शहरातील वाडी परिसरात घडली. मुलीच्या आईने दोघांविरोधात वाडी पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुलीचे पालक सोमवारी संध्याकाळी काही कामानिमित्त बाहेर गेले होते. भाऊ पण खेळायला गेला होता. याचा फायदा घेत मुलीने तिच्या प्रियकराला घरी बोलावले. दोघेही आक्षेपार्ह स्थितीत होते की अचानक मुलीचा 12 वर्षांचा भाऊ घटनास्थळी पोहोचला आणि पालकांना घटनेची माहिती देतो असे सांगण्यास सुरुवात केली.

प्रकरण लपवण्यासाठी मुलीने सांगितली दुसरी गोष्ट
दोघांमध्ये भांडण झाले आणि नंतर मुलीचा प्रियकर स्नेहल सोनपिंपळे (19) मुलीच्या भावाला मारहाण करू लागला. आरोप आहे की, बारा वर्षांच्या मुलाला वाईट पध्दतीने मारल्यानंतरही, जेव्हा ते समाधानी नव्हते, तेव्हा दोघांनी मिळून मुलाचा गळा दाबला. या घटनेनंतर मुलीने तिच्या भावाला जमिनीवर आदळले आणि त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. भावाच्या मृत्यूनंतर बहिणीने आई -वडिलांना फोन करुन सांगितले की, भाऊ खेळत असताना पडला होता आणि उठू शकत नव्हता. घरी परतल्यावर पालकांनी तपासणी केली तेव्हा भाऊ मृत झाला होता.

पोलिसांना मुलीचा असा संशय आला
यानंतर तपासासाठी घटनास्थळी पोहचलेले पोलिस उपायुक्त नूरुल हसन यांनी मृतदेह पाहिला आणि त्यांना संशय आला. मुलाच्या शरीरावर अनेक ठिकाणी जखमेच्या खुणा होत्या आणि मानेवर स्क्रॅचच्या खुणाही आढळल्या होत्या. यावर हसनला काही शंका आली आणि त्याला मुलीच्या मोबाइल फोनचे कॉल डिटेल्स काढले. यामध्ये दिवसातून अनेक वेळा स्नेहल सोनपिंपळे यांच्याशी संभाषणाचे रेकॉर्ड मिळाले. यानंतर मुलीला ताब्यात घेऊन चौकशी केली, काही तासातच तिने आपला गुन्हा कबूल केला. यानंतर तिच्या प्रियकराला मंगळवारी सकाळी अटक करण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...