आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागपूर:गाईच्या पोटातून काढला 80 किलो प्लॅस्टिक कचरा!

नागपूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • गोभक्त सुनील मानसिंगका यांच्या जागरूकतेमुळे या गाईचा जीव वाचला

एका गाईच्या पोटातून चक्क 80 किलो प्लॅस्टिक कचरा काढल्याची घटना नागपूर येथे घडली. या गाईवर स्थानिक गाेरक्षणमध्ये पुढील उपचार होणार आहे. गोभक्त सुनील मानसिंगका यांच्या जागरूकतेमुळे या गाईचा जीव वाचला. माणसाची सकाळ दुधाच्या पाॅलिथीन पिशवीपासून होते. कापडी पिशव्यांचा वापर सांगूनही काेणी करीत नाही. परिणामी घराघरातून बाहेर पाॅलिथीन पिशव्यांसह प्लॅस्टिक कचरा फेकला जातो. बहुतांश वेळा मोकाट चरणारी गाई गुरे हा कचरा खातात. अशीच एक गाय सुनील मानसिंगका यांच्या लक्षात आली.

महाल परिसरातील बडकस चौकात असलेले सुनील मानसिंगका नित्यनेमाने गायीला गोग्रास देतात. िवहिंपच्या गोरक्षा विभागाचे केंद्रीय मंत्री असलेले मानसिंगका यांचे परिसरातील गाईंकडे लक्ष असते. पोट खूप फुगलेली एक गाय त्यांच्या लक्षात आली. रवंथ केलेला चारा तिच्या नाक व तोंडावाटे बाहेर पडत होता. त्यांनी पशुवैद्यकाला गाईला दाखवले असता पोटात जमा झालेल्या प्लॅस्टिक पिशव्यांमुळे पोट फुगले असून शस्रक्रियेद्वारे कचरा बाहेर काढता येईल, असे सांगितले.

त्या नंतर गोरक्षण सभा धंतोली येथील गोरक्षण सभेच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात डाॅ. मयूर काटे व त्यांचे सहकारी पशुधन पर्यवेक्षक शेखर मेश्राम व मुकेश चवरे यांनी शस्रक्रिया करून 80 किलो प्लॅस्टिक पिशव्या काढल्या. यासाठी गोरक्षण सभेचे हर्षल आर्वीकर, सुमीत माईकर व आशिष कावळे यांचे सहकार्य लाभले.

बातम्या आणखी आहेत...