आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Nagpur
  • Nagpur News And Uodatesl The Murder Took Place But, Due To Lack Of Evidence, Accidental Death Was Recorded; The Crime Will Be Filed After The Advance PM's Report

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नागपूर:खून तर झाला पण, पुरावा नसल्याने आकस्मिक मृत्यूची नोंद; अॅडव्हाॅन्स पीएम रिपोर्टनंतर दाखल करणार गुन्हा

नागपूर4 महिन्यांपूर्वीलेखक: अतुल पेठकर
  • कॉपी लिंक
  • रिपोर्ट नंतर पुढील कार्यवाही करणार

खून तर झाला. पण, घटनास्थळावर खून झाल्याचा काेणताही पुरावा मिळाला नाही. शिवाय त्याविषयी नेमकेपणाने काही सांगणारेही नसल्याने पोलिसांनी तुर्तास आकस्मिक मृत्यूची नोंद केल्याची घटना नागपुरात घडली. आता अॅडव्हाॅन्स पीएम रिपोर्टनंतर याविषयी निर्णय घेण्यात येणार आहे.

रविवार, (3 जानेवारी) रात्री ११ वाजता सुदामनगरी, गवळीपूरा येथील एक व्यक्ती आपण आपल्या भावाचा गळा दाबून खून केल्याचे परिसरात सांगत फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीवरून खात्री केली असता मृतक सेवानंद रोशनलाल यादव (वय ४८) हा त्याच्या घरी मृतावस्थेत मिळून आला. तसेच त्याचा भाऊ परमानंद रोशनलाल यादव (वय ३८) यास विचाररपूस केली असता तो पूर्णपणे दारूच्या फुल अंमलाखाली होता.

घटनास्थळाला भेट देऊन मृतकाची पाहणी केली असता प्राथमिकदृष्ट्या गळा आवळून मारल्याचे निशाण किंवा इतर पुरावा आढळून आला नाही. घटनास्थळा शेजारील साक्षीदार व मृतकाचे इतर भाऊ यांना विचारपूस केली असता त्यांनी याबाबत कुठलीही पूरक माहिती दिली नाही, असे पोलिसांनी सांगितले. मृतकाच्या मरणाबाबत व झालेल्या घटनेबाबत ठोस पुरावा नसल्याने सध्या प्राथमिकदृष्ट्या अकस्मात मृत्यूची (मर्ग) नोंद केली आहे. अॅडव्हाॅन्स पी. एम. रिपोर्ट नंतर पुढील कार्यवाही करणार असल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नरेंद्र हिवरे यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...