आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खळबळजनक:खुले नाट्यगृहाच्या मोकळ्या मैदानात आढळल्या मानवी कवट्या

नागपूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या रेल्वे स्टेशन मार्गावरील खुले नाट्य गृहाच्या (नीलम लॉन) एका मोकळ्या जागेत मानवी कवट्यासह इतर मानवी सांगाड्याचे काही भाग आढळल्याची घटना आज शुक्रवारी निदर्शनास आल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली. एका कचरा वेचणाऱ्याने याची माहिती पोलिसांना दिली.

या घटनेची माहिती वाऱ्यासारखी शहरात पसरताच बघ्यांची एकच गर्दी जमली. नवीन कामठी पोलिसांनी त्वरित घटनास्थळ गाठून पाहणी केली असता सदर मानवी कवटी व मानवी सांगाडेचे काही साहित्य हे बायो वेस्टेज प्रकाराचा एक भाग असून कदाचित हे कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकले असण्याची शक्यता वर्तवली. आरोग्य विभागातील प्रशिक्षणार्थी आरोग्य कर्मचाऱ्यांना शवविच्छेदन तसेच मानवी शारीरिक अभ्यासा दरम्यान वापरण्यात येणारे मानवी कवटी व साहित्य असल्याचा तर्क लावण्यात येत आहे. याबाबतचे वास्तविक सत्य लवकरच पुढे येईल.

मात्र आढळलेल्या मानवी कवटी व मानवी सांगाड्याच्या इतर तुकड्यांमुळे चर्चेला पेव फुटले आहे. मात्र पोलीस या सर्व नकारात्मक व संशयास्पद चर्चेला नाकारत असा कुठलाही विषय नसून कचऱ्याच्या ढिगाऱ्यातून भंगार वेचणाऱ्याना ह्या मानवी कवटी साहित्य सापडले असून त्यांनीच सदर घटनास्थळी फेकले असावे असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. घटनास्थळी नवीन कामठी पोलिस स्टेशनचे गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक कमलाकर गड्डीमे, एपीआय भातकुले व पोलीस सहकारी घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे.