आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्ह्यातील शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची नोंदणी ‘प्री-व्होटर’ म्हणून होणार आहे. तसा धडक कार्यक्रम हाती घेण्यात येणार आहे. प्राचार्य व मुख्याध्यापकांनी 17 वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी भावी मतदार(प्रि-व्होटर) म्हणून नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.
जिल्ह्यातील शाळा व महाविद्यालयाचे प्राचार्य व मुख्याध्यापक तसेच शिक्षक मतदार संघाच्या मतदार यादीमध्ये नाव नोंदणी करण्याचे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केले असून उपजिल्हाधिकारी निवडणूक मिनल कळसकर, उपजिल्हाधिकारी हेमा बढे, उपविभागीय अधिकारी शेखर घाडगे तसेच निवडणूकविषयक अधिकाऱ्यांना या बाबतीत सर्वांच्या सहकार्याने मोहीम हाती घेण्याचे निर्देश दिले आहे.
महाविद्यालयातील 17, 18 व 19 वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी भावी मतदार म्हणून नाव नोंदणीसाठी फॉर्म भरावा. त्यामध्ये नमूना क्रमांक 6 कसा भरावा, यांचे प्रात्यक्षिक दाखवून त्यांना मार्गदर्शन करण्यात आले. यात सर्वांना व्होटर हेल्पलाईन ॲप डाऊनलोड करण्यास सांगितले व त्या ॲपमध्ये माहिती कशी भरावी याचेही प्रात्यक्षिक करुन दाखविण्यात यावे. असे प्रात्यक्षिक महाविद्यालयात व्हिडीओ कॉन्सफरन्सद्वारे घेऊन विद्यार्थ्यांना फॉर्म भरायला लावण्याबाबत जिल्हाधिकारी यांनी आवाहन केले.
शिक्षक मतदार संघ, मतदार नोंदणी करण्यासाठी पात्रता काय आहेत, याचेही मार्गदर्शन करण्याच्या सूचना देण्यात आल्या. अर्जदार हा नागपूर विभाग शिक्षक मतदार संघातील सर्व साधारण रहिवासी असावा. 1 नोव्हेंबर पूर्वीच्या लगतच्या 6 वर्षापैकी 3 वर्ष माध्यमिक स्तर किंवा त्यावरील शिक्षण संस्थेत शिकविण्यासाठी कार्यरत असणे आवश्यक आहे.
नमून 19 सोबत लगतचे 1 नोव्हेंबरपासून पूर्वीचे 6 वर्षामध्ये 3 वर्ष सेवा कालावधी असून एखादा शिक्षक सेवानिवृत्त झालेला असेल तरीही ते आपल्या नावाची नोंदणी करु शकतात. जिल्हा प्रशासनातर्फे मतदार नोंदणीसाठी वेगवेगळे उपक्रम आयोजित केले जातात. काही दिवसांपूर्वी फुटाळा तलावावर युवक युवतींसाठी आयोजित कार्यक्रमात वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले होते. त्यावेळी मोठ्या संख्येने मतदार नोंदणी झाली होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.