आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धक्कादायक प्रकार:यूट्यूबवर पाहून बॉम्ब तयार केला, पण निकामी न करता आल्याने गाठले थेट पोलिस ठाणे

नागपूर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • रोपी राहुल युवराज पगाडे (वय 25) याने हा बॉम्ब तयार केला

नागपूर शहरात काही दिवसांपूर्वी यूट्यूब पाहून एका मुलाच्या हत्येचा कट आखल्याची घटना घडली होती. ती घटना ताजी असतानाच आता एका युवकाने यूट्यूबवर पाहून बॉम्ब तयार केल्याची घटना घडली. या घटनेमुळे नागपूर शहरात सर्वत्र खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी राहुल युवराज पगाडे (वय 25)ने यूट्यूबवर बॉम्ब तयार करण्याचा व्हिडियो बघून एक गावठी बॉम्ब तयार केला. पण, नंतर त्याला तो बॉम्ब निकामी करता न आल्याने तो घाबरला आणि तो बॉम्ब हातात घेऊन थेट पोलिस ठाणे गाठले. तरुण हातात बॉम्ब घेऊन आल्याची माहिती मिळताच पोलिस ठाण्यात एकच खळबळ उडाली.

घटना नागपूर शहरातील नंदनवन पोलिस ठाण्याच्या हद्दीतील साईबाबा नगरची आहे. आरोपी राहुलने पोलिसांना बॉम्बची माहिती देताच बॉम्ब शोधक व नाशक पथकाला बोलावण्यात आले. पथक आल्यानंतर त्यांनी या गावठी बॉम्बचे इलेक्ट्रिक सर्किट वेगळे करुन बॉम्ब निकामी केला. दरम्यान, पोलिसांनी संबंधित प्रकरणात आरोपीला अटक केली असून त्याच्याविरुद्ध भादंवि कलम 285, 286 , 7, 25(1) (क) नुसार गुन्हा दाखल केला आहे.

बातम्या आणखी आहेत...