आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिसांच्या आयडियाचे कौतुक:महिला पोलिस शिपायाने प्रेमिका होऊन केली घरफोड्याला अटक; आरोपींसह दोन अल्पवयीन ताब्यात

नागपूर9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

एका घरफोड्याला पकडण्यासाठी एमआयडीसी पोलिसांनी वेगळीच शक्कल लढवली. घरफोड्याचा विक पाॅइंट ओळखून एका महिला पोलिस शिपायाने घरफोड्याशी संपर्क साधून त्याच्याशी प्रेमाच्या गोष्टी केल्या. नंतर त्याला भेटायला बोलावले. घरफोड्या येताच त्याला अटक केली. सोबत दोन अल्पवयीन आरोपींनाही ताब्यात घेतले आहे. एमआयडीसी पोलिसांच्या या आयडीयाचे कौतुक हाेत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार सहकारनगर निवासी संजय रतनकुमार चौधरी (वय 53) यांच्या कंपनीतून आरोपींनी लाखोच्या मालाची चोरी केली. आरोपी अंकेश उर्फ टोबो रामसिंह पाल व त्याच्या सहकाऱ्यांनी ही चोरी केली असून ते फरार असल्याची माहिती गुप्त बातमीदाराने दिली.

पोलिसांनी रचला सापळा

तपासी हवालदाराने गुप्त माहिती काढली असता आरोपी टोबो त्याच्या दोन गर्लफ्रेण्डसोबत तासनतास बोलत असल्याची माहिती मिळाली. त्याची कमजोरी समजताच एमआयडीसी पोलिसांनी वेश बदलून सापळा रचला. एका महिला पोलिस शिपायाने त्याच्याशी संपर्क साधून त्याला बोलण्यात गुंतवून ठेवले. आपल्या जाळ्यात नवी प्रेमिका फसल्याचे टोबोला वाटले. त्या नंतर अनेकवेळा टोबोने फोन केल्यानंतर प्रेमिका झालेल्या महिला शिपायाने त्याला लोकमान्य नगर मेट्रो स्थानकावर भेटायला बोलावले. जाळ्यात येऊन टोबो तिथे पाेहोचला व त्याने महिला शिपायाशी बोलणे सुरू केले. तिथे साध्या वेशात फिरत असलेल्या पोलिसांनी त्याला पकडले. त्याच्यासोबत दोन अल्पवयीन साथीदारांनाही ताब्यात घेतले. त्याच्या जवळून 96 हजाराचा माल जप्त केला.

बातम्या आणखी आहेत...