आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वादग्रस्त पुरीचा गणपती अजूनही कुलूपबंदच:रितसर विसर्जन करू देण्यासाठी आयुक्तांकडे मागणी

नागपूर21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपुरातील गुलाब पुरी यांचा गणपती गणेशस्‍थापनेच्या निमित्ताने हाताळण्यात येणाऱ्या वादग्रस्त विषयांमुळे राज्यात प्रसिद्ध आहे. 50 वर्षांपूर्वी पाचपावली परिसरातील सामाजिक कार्यकर्ते गुलाब पुरी यांनी वादग्रस्त देखाव्यातून सामाजिक संदेश देणारा गणपती प्रतिष्ठापित करण्याची परंपरा सुरू केली. हा गणपती गणेश चतुर्थीच्या दिवशी स्थापना न करता गणेशोत्सवा दरम्यानच्या कुठल्याही दिवशी स्थापन केला जातो.

त्यांचे नातू शिवम पुरी यांनी यावर्षीही परंपरेप्रमाणे देखाव्यासह गणपती तयार केला. परंतु पोलिसांनी यावर्षी गणपती स्थापन होण्यापूर्वीच गणपती असलेल्या खोलीलाच कुलूप लावले. नागपुरातील सर्व घरगुती आणि सार्वजनिक गणपतींचे विसर्जन शुक्रवार 9 सप्टेंबर रोजी झाले. परंतु पाचपावली पोलिसांनी कुलूप न काढल्यामुळे पुरीच्या गणपतीची पूजेची लहान व स्थापनेची मोठी अशा दोन्ही मूर्ती अजूनही कुलुपबंद आहे. आम्हाला रितसर विसर्जन करू द्यावे अशी मागणी पुरींनी पोलिस आयुक्तांना निवेदन देऊन केली आहे.

गणपती खोलीत बंदिस्त

उत्सव साजरा करण्यासाठी महापालिकेकडून रितसर परवानगी घेण्यात आली होती. स्थापनेपूर्वी दोन्ही मूर्ती नरेंद्र गुलाब पुरी यांच्या घरातील एका खोलीत ठेवण्यात येऊन मंडळ सदस्यांंनी खोलीला कुलूप लावले. मंडळाच्या परंपरेप्रमाणे 31 ऑगस्ट रोजी पूजेच्या गणपतीची स्थापना केली. 4 सप्टेंबर रोजी मोठा गणपती देखाव्यासह स्थापन करण्यात येणार होता. परंतु पोलिस तत्पूर्वीच गणपती असलेल्या खोलीची चावी जबरदस्तीने घेऊन गेले. तेव्हापासून आजपर्यत गणपती खोलीत बंदिस्त असल्याचे पुरी यांनी निवेदनात नमूद केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुतळा पोलिसांनी जप्त केला आहे.

मूर्ती व देखावे जप्त

दहा दिवस होऊनही दोन्ही गणपतींचे विसर्जन झालेले नाही. तेव्हा मोठ्या गणपतीची रितसर स्थापना करून विसर्जन करण्याकरीता गणपती असलेल्या खोलीची चावी परत करण्यात यावी अशी मागणी चंद्रशेखर पुरी यांनी केली आहे. दरवर्षी गणपती स्थापन झाल्यानंतर मूर्ती व देखावे जप्त केले जातात. परंतु यावर्षी पोलिसांनी अतिरेक करीत स्थापनाच होऊ दिली नाही. परिणामी गणपती खोलीत बंदिस्त असल्याचा आरोप पुरींनी केला आहे.

बातम्या आणखी आहेत...