आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्जात बुडाल्याने केला लुटण्याचा बनाव:नोकरच निघाला चोर, गुन्हे शाखेकडून अटक

नागपूर6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भरदुपारी तिघांनी युवकाकडून वीस लाख रुपये असलेली बॅग हिसकाविल्यची घटना गुरुवारी चिखली उड्डानपुलावर घडल्याची माहिती समोर आली. मात्र, याप्रकरणी कर्जात बुडाला असल्याने खुद्द नोकरानेच पैसे चोरल्याचा बनाव केल्याची माहिती समोर आली आहे. युनिट 5 चे पोलिस निरीक्षक महेश साळुंके यांच्या पथकाने युवकाला अटक करीत यशोधरानगर पोलिसांच्या ताब्यात दिले.

जरिपटका राहणारे मोहन साजवानी या मिरची व्यावसायिकाकडे सिद्धार्थ पुरुषोत्तम रामटेके (वय 27, रा.जुनी मंगळवारी) काम करतो. बुधवारी त्याने मालकाकडून 20 लाख रुपये घेतले. ते कळमना येथील व्यापाऱ्याकडे नेण्यासाठी आपल्या ॲक्टिव्हावरुन यशोधरानगर पोलिस ठाण्यांतर्गत चिखली उड्डाणपूल परिसरात दुपारी 3 वाजताच्या सुमारास जात असताना, अचानक पाऊस येत असल्याने रेनकोट घालण्यासाठी थांबला. तेव्हाच अचानक तीन युवकांनी त्याच्या डोक्यावर वार केला. हेल्मेट असल्याने तो दचकला यादरम्यान तिघेही समोर ठेवलेली बॅग हिसकावून पळून गेले. दरम्यान या प्रकाराची माहिती त्याने मालक मोहन साजवानी यांना दिली. त्यांनी यशोधरानगर ठाण्यात तक्रार दाखल केली.

पथकाला युवकावर संशय

दरम्यान, या प्रकरणाचा तपास करीत असताना, गुन्हे शाखेच्या पथकाला युवकावर संशय आला. त्यांनी सिद्धार्थला ताब्यात घेत, त्याची विचारणा केली असता, त्यानेच पैशाच्या गरजेपोटी बॅग लुटल्याचा बनाव केल्याची कबूली दिली. दरम्यान पथकाने त्याला अटक करीत, पैसेही ताब्यात घेतले. यावेळी त्याला यशोधरानगर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

टाळेबंदीमुळे होता कर्जात

सिद्धार्थचे रमना मारोती परिसरात इलेक्ट्रीकचे दुकान आहे. मात्र, पहिल्या आणि दुसऱ्या टाळेबंदीमुळे त्याचे दुकान बंद झाल्याने तो कर्जबाजारी झाला. दरम्यान त्याने ज्यांना सामान दिले, त्यांचाही मृत्यू झाल्याने थकीत रक्कम बुडाली. त्यातून तो बऱ्याच प्रमाणात कर्जात बुडाला. त्यामुळे त्याला पैशाची चणचण भासू लागली. यातून त्याने ही योजना तयार करीत, स्वतःला तीन युवकांनी लुटल्याचा बनाव करीत, 20 लाख रुपये मिळविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याबाबत कुठलेही सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज न मिळाल्याने तो गुन्हे शाखेच्या तपासात अडकला.

बातम्या आणखी आहेत...