आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागपुरात वादावादी:​​​​​​​धक्काबुक्की... ‘जय श्रीराम, गणपती बाप्पा मोरया’चे नारे, संघ मुख्यालयाजवळ भाजप-काँग्रेस कार्यकर्त्यांत राडा

नागपूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
संघ मुख्यालयाजवळ घोषणाबाजी करताना काँग्रेस कार्यकर्ते. - Divya Marathi
संघ मुख्यालयाजवळ घोषणाबाजी करताना काँग्रेस कार्यकर्ते.
  • भाजप कार्यकर्त्यांनी ‘जय श्रीराम’च्या घोषणा देणे सुरू करताच काँग्रेस कार्यकर्त्यांनीही त्याच घोषणा देणे सुरू केले.

महागाई, बेरोजगारीच्या निषेधार्थ काँग्रेसने काढलेली दुचाकी रॅली रविवारी रा. स्व. संघाच्या मुख्यालयाजवळून जात असताना भाजप आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी, धक्काबुक्की झाली. यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता. काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव आणि नगरसेवक बंटी शेळके यांच्या नेतृत्वात रविवारी संघ मुख्यालय ते संसद भवन, दिल्ली अशी दुचाकी रॅली निघाली. संघ मुख्यालयाकडे जाणाऱ्या गल्लीत रॅली वळताच भाजप कार्यकर्त्यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना रोखले. त्यात दोन्ही बाजूचे कार्यकर्ते भिडले. भाजप कार्यकर्त्यांनी ‘जय श्रीराम’च्या घोषणा देणे सुरू करताच काँग्रेस कार्यकर्त्यांनीही त्याच घोषणा देणे सुरू केले.

अतिसंवेदनशील भागात रॅली कशी निघाली ?
भाजप कार्यकर्त्यांचा रेटा पाहून काँग्रेस कार्यकर्त्यांनी नमते घेत तिथून बडकस चौकाकडे रॅली वळवली, तर भाजप कार्यकर्त्यांनी बडकस चौकात धाव घेतली. परंतु तिथे मोठ्या संख्येत पोलिस पोहोचल्याने पुढील तणाव व संघर्ष टळला. संघ मुख्यालयाचा परिसर हा अतिसंवेदनशील सुरक्षा परिसर असल्याने तिथे रॅली पोहोचलीच कशी, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

बातम्या आणखी आहेत...