आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हळहळ:मुलगी वारल्याने पत्नी माहेरी गेली, पतीला भेटण्यास दिला नकार; विरहात पतीची विष प्राशन करत आत्महत्या

नागपूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुलीच्या मृत्यू नंतर माहेरी गेलेली पत्नी भेटत नसल्याने पतीने घरी येऊन विष प्राशन करत आत्महत्या केल्याची घटना पाचपावली पाेलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. मृतकाची दीड वर्षाची मुलगी आजाराने मरण पावली होती. या घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पाचपावली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मोचीपुऱ्यात राहाणारे पिंटु उर्फ राेहित मधुकर कुलसंगे (वय 28) याने घरी विषारी औषध प्राशन केले. त्याला उपचारार्थ मेयो हाॅस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान 6 एप्रिल रोजी त्याचा मृत्यू झाला.

पिंटुचे तीन वर्षांपूर्वी लग्न झाले होते. त्याला एक दीड वर्षाची मुलगी होती. 27 मार्च रोजी मुलगी आजाराने मरण पावली. त्यानंतर त्याची सासू मुलगी दिपालीला दुखवट्यासाठी घरी घेऊन गेली. पिंटु पत्नी दीपालीला भेटण्यासाठी सासरी जात असता सासरचे त्याला भेटू देत नव्हते. पिंटुची बहीण स्वाती गेडाम हीने दीपालीशी मोबाईलवर बोलण्याचा प्रयत्न केला असता तिने प्रतिसाद दिला नाही.

5 एप्रिल रोजी दुपारी 3 वाजताच्या सुमारास पिंटु बाहेरून घरी आला. त्याच्या हातात फ्रुटी होती. त्याने फ्रुटी ग्लासमध्ये ओतून त्यात विषारी औषध मिसळून प्राशन केले. थोड्याच वेळात त्याची तब्येत बिघडली. त्याला लागलीच मेयोमध्ये दाखल केले असता 6 एप्रिल रोजी मरण पावला.

कौटुंबिक वादातून चाकू मारून पत्नीची हत्या

दारूचे व्यसन असलेल्या एका व्यक्तीने पत्नीची चाकू खूपसून हत्या केल्याची घटना शुक्रवारी घडली. हत्ये नंतर आरोपी मनोज सरोदे फरार झाला. पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार मूळचा वर्धा जिल्ह्यातील आर्वीचा असलेला मनोज सरोदे सहा महिन्यांपूर्वी नागपुरात राहायला आला. पत्नी माधुरी, एक मुलगा व एक मुलगी असे कुटुंब आहे. तो एका खासगी कंपनीत काम करायचा.

गेल्या काही दिवसांपासून मनोज आणि माधुरीत भांडणे सुरू होती. गुरूवारी मध्यरात्रीही त्यांच्यात भांडण झाले. ते इतके विकोपाला गेले की दारूच्या नशेत असलेल्या मनाेजने माधुरीवर चाकूने सपासप वार केले. त्यात ती जागीच ठार झाली. त्या नंतर मनोज मुलांना तिथेच सोडून पसार झाला. ही घटना झाली त्यावेळी मुलगी बाहेर होती. तर मुलगा शेजाऱ्यांकडे झोपायला गेला होता. सकाळी तो घरी येताच त्याला रक्ताच्या थारोळ्यात पडलेली आई दिसली. त्याने शेजाऱ्यांना सांगितले. लागलीच वाडी पोलिसांना कळवण्यात आले.