आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्नाला नकार दिल्याने प्रियकराची आत्महत्या,:प्रियकराने गळफास घेतल्याचे कळताच कुटुंबासह प्रेयसी फरार, आकस्मिक मृत्यूची नोंद

नागपूर15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

लग्नाला नकार दिल्याने प्रियकराने आत्महत्या केल्याची घटना नागपुरात घडली आहे.नकार पचवू न शकल्याने प्रियकराने हाताची नस कापली व नंतर गळफास घेऊन आत्महत्या केली. प्रियकराने आत्महत्या केल्याचे समजताच तरुणी कुटुंबासह फरार झाल्याने परिसरात खळबळ उडाली.

सुनील (21,रा. कळमना) असे मृत प्रियकराचे नाव आहे. शाळेत असल्यापासून दोघांचे प्रेमप्रकरण सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. दहाव्या वर्गात शिकत असतानाच आठव्या वर्गात शिकणाऱ्या मुलीसोबत सुनीलची मैत्री झाली. तेव्हापासूनच दोघांचेही प्रेमप्रकरण सुरू झाले.

अपहरणाचा गुन्हा

दोघांनीही एकाच महाविद्यालयात प्रवेश घेतला व लग्न करण्याचा निर्णय घेतला. प्रेमिका वयाच्या 16 व्या वर्षीच लग्न करण्यासाठी तयार झाली. दोघांनीही घरातून पळ काढला. मात्र, ती अल्पवयीन असल्यामुळे तिच्या आईवडिलांनी पोलिसांत अपहरण केल्याची तक्रार दिली. त्यामुळे सुनीलवर अपहरणाचा गुन्हा दाखल झाला. मात्र, त्या नंतरही दोघांच्याही भेटी-गाठी सुरूच राहिल्या.

प्रेयसीचा लग्नाला नकार

शाळेत असतानापासून प्रेमप्रकरण सुरू असतानाही प्रेयसीने लग्नाला नकार दिला. त्यामुळे प्रियकराने आत्महत्या केली. मात्र, प्रियकराने आत्महत्या केल्याचे समजताच प्रेमिका कुटुंबासह फरार झाल्याने नागरिकांमध्ये संतप्त भावना आहे. पोलिसांनी फरार प्रेमिकेला पकडून आणण्याची मागणी समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी तूर्तास आकस्मिक मृत्यूची नोंद केली. सुनीलला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्यामुळे रियावर पोलिसांनी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी सुनीलच्या घरच्यांनी केली आहे

गळफास घेऊन आत्महत्या

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रेमिकेचा नकार पचवू न शकलेल्या प्रियकराने ब्लेडने हाताची नस कापण्याचा प्रयत्न केला व नंतर गळफास घेऊन आत्महत्या केली.

सुनील बुटीबोरीतील टायरच्या कंपनीत नोकरीला लागला. 18 वर्षे पूर्ण झाल्यामुळे आता लग्न करण्यासाठी दोघेही प्रयत्नात होते. 9 मार्चला त्याने रियाने त्याची भेट घेतली. तिने लग्न करण्यास नकार दिला. त्यामुळे सुनील नैराश्यात गेला. त्याने हाताची नस ब्लेडने कापली आणि आत्महत्येचा प्रयत्न केला. त्याला कुटुंबीयांनी रुग्णालयात नेले.

तो स्वत:ला खोलीत कोंडून घेऊन एकटा राहायला लागला. प्रेयसीने दिलेल्या नकारामुळे खचलेल्या सुनीलने 15 मार्चला दुपारच्या सुमारास घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याचा भाऊ बाजारातून घरी आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.

बातम्या आणखी आहेत...