आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Nagpur
  • Nagpur The Girls Who Are Not Ready To Return Home Are Finally Handed Over To Their Families | Child Welfare Committee Counseled The Parents

घरी परतायलाच तयार नसलेल्या मुली अखेर घरच्यांच्या स्वाधीन:बालकल्याण समितीने केले आई वडीलांचे समुपदेशन

नागपूर22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कपील नगर पोलिस ठाण्यातंर्गत येणाऱ्या दोन अल्पवयीन मुली घरून निघून गेल्याची घटना 31 ऑगस्ट रोजी घडली होती. या दोन्ही मुली घरी परतायलाच तयार नसल्याने पोलिसांसमोर मोठा पेच निर्माण झाला होता. या मुलींना बालकल्याण समिती समोर सादर करण्यात आले. तिथे समितीने मुलींची समजूत काढीत आई वडीलांचे समुपदेशन केल्यानंतर मुलींना आई वडीलांकडे सोपवण्यात आल्याची माहिती महिला व बालकल्याण समिती सदस्य छाया राऊत यांनी दिली.

प्रारंभी या मुली घरी जाण्यासाठी तयार नसल्याने त्यांना मुलींना बालसुधारगृहात ठेवण्यात आले होते. पोलिसांनी मुलींना ताब्यात घेतले. त्यांना घरी सोडून देतो असे सांगताच मुलींना ठामपणे नकार दिला होता. आम्ही बाहेरच नोकरी वा काम करून राहु. परंतु घरी परत जाणार नाही असे सांगितल्याने त्यांना काटोर रोड येथील बालसुधारगृहात ठेवले होते. नंतर या मुलींना बालकल्याण समितीसमोर उपस्थित केले गेले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 31 आॅगस्ट रोजी 40 वर्षीय फिर्यादीची 17 वर्षीय अल्पवयीन मुलगी शेजारी टीव्ही पाहायला जाते असे सांगून घरून निघून गेली. बराच वेळ होऊनही मुलगी परत न आल्याने तिची आई शेजारी विचारण्यासाठी गेली असता शेजारच्यांची 15 वर्षीय मुलगीही बेपत्ता असल्याची माहिती मिळाली.

घरची परिस्थिती बेताची

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 17 वर्षीय अल्पवयीन मुलीजवळ 500 तर 15 वर्षीय अल्पवयीन मुली जवळ 100 रूपये होते. 17 वर्षीय अल्पवयीन मुलीची आई कामानिमित्त हैद्राबादला गेली होती. दरम्यान मुलगी घरून निघून गेली. आई परतल्यानंतर तिने शेजारी चौकशी केली असता त्यांचीही मुलगी निघून गेल्याचे समजले. झोपडपट्टीत राहाणाऱ्या मुलींच्या घरची परिस्थिती खूपच बेताची आहे. घरून निघून गेल्यानंतर मुली प्रथम बर्डी येथील एका नातेवाईकाच्या घरी गेल्या.

परंतु त्याने समजावून घरी परत जाण्यास सांगितल्यानंतर दोघीही बर्डी येथील एका मंदिरात गेल्या. 1 सप्टेंबरचा दिवस व रात्र त्यांनी मंदिरात काढली. नंतर त्या फिरत फिरत बेझनबाग मैदानात आल्या. त्या भागात काही ठिकाणी फिरून काम शाेधत होत्या. जवळ पैसे असल्याने चिप्स व फरसाण घेऊन दिवस काढत होत्या. बेझनबाग परिसरात असताना तिथून येणाऱ्या जाणाऱ्यांना फोन करू देण्याची विनंती करीत होत्या.

अशा सापडल्या होत्या मुली

या मुलींनी एका झोमॅटाे डिलिव्हरी बाॅयच्या मोबाईलवरून एका नातेवाईकाला 1 सप्टेंबरला रात्री दहाच्या सुमारास फोन केला होता. पोलिसांनी सर्व नातेवाईकांना विचारणा केली असता त्या नातेवाईकाने झोमॅटो डिलिव्हरी बाॅयचा नंबर दिला. पोलिसांनी या डिलिव्हरी बाॅयला 2 सप्टेंबरला फोन करून बोलावून घेतले.

बातम्या आणखी आहेत...