आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रेमडेसिवीर:नागपूरसाठी 10 हजार रेमडेसिवीर पाठवा; खंडपीठाचे राज्य सरकारला आदेश

नागपूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • मागील सुनावणीत काय झाले होते ?

नागपूरसाठी १० हजार रेमडेसिविर इंजेक्शन देण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी दिले. राज्य सरकारने नागपूरला किती रेमडेसिविर दिले, काय तरतूद केली, असा सवाल करून राज्य शासनाने नागपूरसाठी नक्की किती रेमडेसिविर दिले आहेत हे स्पष्ट करावे. तसेच केंद्राने महाराष्ट्रासाठी नक्की काय तरतूद केली आहे, हेसुद्धा कोर्टात सादर करावे, असे निर्देश खंडपीठाने दिले आहेत.

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नागपुरातील कोरोना परिस्थितीसंदर्भात प्रसिद्धिमाध्यमांमध्ये प्रकाशित बातम्यांवरून स्वतःहून जनहित याचिका दाखल करून घेतली आहे. तसेच याप्रकरणी अॅड. श्रीरंग भांडारकर यांची न्यायालयीन मित्र (अम्यॅकस क्युरी) म्हणून नेमणूक केली अाहे. या जनहित याचिकेवर सोमवारी न्या. एस. बी. शुक्रे आणि न्या. एस. एम. मोडक यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.

या वेळी अॅड. तुषार मांडलेकर म्हणाले की, ठाण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी २६६४ रुग्णांसाठी ५३२८ कुप्यांची व्यवस्था केली. नागपुरात ८,२१५ रुग्णांसाठी केवळ ३३२६ कुपींचे वाटप झाले. नागपुरात भीषण कमतरता आहे. राज्य सरकारने काहीतरी करायला हवे. आपण राज्य सरकारला आपत्कालीन परिस्थितीत १० ते १५ हजार रेमडेसिविर देण्याची विनंती करू शकता का, असे ते म्हणाले. यावर राज्य सरकारने आज २५०० कुप्या दिल्याचे न्यायालयाला सांगितले. त्यावर हे पुरेसे प्रमाण नसल्याचे सांगून वरील आदेश दिले.

मागील सुनावणीत काय झाले होते ?
याप्रकरणी गेल्या १२ एप्रिल रोजी झालेल्या सुनावणीदरम्यान न्या. झेड. ए. हक आणि न्या. अमित बोरकर यांच्या खंडपीठाने कोरोना साथरोगाच्या प्रादुर्भावामुळे नागपुरात निर्माण झालेल्या भीषण परिस्थितीची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तत्काळ दखल घ्यावी, असे निर्देश दिले होते.


बातम्या आणखी आहेत...