आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी एक्सक्लूझिव्हहिवाळी अधिवेशन:सरकारी बाबू अन् नेत्यांसाठी चित्रपटांची मेजवानी; नागपुरात डिजिटल थिएटर उभारले

अतुल पेठकर l नागपूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूरच्या हिवाळी अधिवेशनानिमित्त संपूर्ण राज्यातून येथे आमदारांसह वेगवेगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांचे लोकप्रतिनिधी तसेच संपूर्ण राज्यातून आयएएस, आयपीएस, सरकारी व निमसरकारी सेवेतील अधिकारी येथे मुक्काम ठोकून असतात. त्यांच्यासाठी म्हणून अधिवेशन कालावधीत दहा मराठी चित्रपट दाखविण्यात येणार असल्याची माहिती विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांनी दिली. या चित्रपटानंतर कलाकारांशी ऑनलाईन संवादही घडवून आणला जाणार आहे.

अधिवेशन कालावधीत आमदार निवासासह इतर ठिकाणी कार्यकर्ते राहातात. तर अधिकारी आपापल्या व्यवस्थेने येतात. सर्वाधिक वावर सिव्हिल लाईन परिसरात असतो. आमदार निवास परिसरातच वसंतराव देशपांडे सभागृह आहे. या सभागृह परिसरात एक तात्पुरते चित्रपटगृह उभारण्यात आले आहे. या चित्रपटगृहात उद्या सोमवार 19 डिसेंबरपाून हे चित्रपट दाखविण्यात येणार आहे. यामध्ये "हरिश्चंद्राची फॅक्टरी', "दुनियादारी', "जैत रे जैत', "नटसम्राट', "टाईमपास', "सैराट', "मी शिवाजीराजे भोसले बोलतोय', "पावनखिंड' हे दहा चित्रपट दाखवले जाणार आहे. या शिवाय "हवाहवाई', "शेर शिवाजी', "गोष्ट छोटी डोंगरा एवढी', "सिंहासन' आदी चित्रपटही दाखविण्यात येणार आहे.

"पिक्चर टाईम' कंपनीतर्फे 150 आसन क्षमतेचे एक मोबाईल डिजिटल मुव्ही थिएटर (एमडीएमटी) वसंतराव देशपांडे सभागृह परिसरात उभारण्यात येत असल्याची माहिती प्रकल्प व्यवस्थापक लोकेश चौधरी यांनी दिली. सुशील चौधरी याचे संस्थापक आहे. या एमडीएमटीमध्ये व्हिडिओ काॅन्फरन्सिंगची सोय असून ते वायफाय, इंटरनेटने जोडले आहे. यात 150 जणांची कार्यशाळा, मिनी काॅन्फरन्स घेता येते. सरकारच्या भागीदारीत अनेक उपक्रमाची अंमलबजावणी करता येते असे चौधरी यांनी सांगितले. एमडीएमटीत सेम डे रिलिज चित्रपट दाखवता येतो. या शिवाय सरकारी योजनानांचा प्रसारही करता येतो. विद्यार्थी स्पर्धा परीक्षांचे व्हिडिओही पाहू शकतात.

.

हे सर्व चित्रपट रसिकमान्य असून त्यांच्या आवडीचे आहेत. अरूण साधू यांच्या कादंबरीवर आधारित "सिंहासन' हा चित्रपट माईलस्टोन आहे. तर "सैराट'ने विक्रमी कमाईचा विक्रम केला आहे. "गोष्ट छोटी डोंगरा एवढी'मधून शेतकऱ्यांची विदारक व्यथा मांडण्यात आली आहे. सर्वच चित्रपटांनी रसिकांची दाद मिळवली आहे. नागपूर हिवाळी अधिवेशनात पहिल्यांदाच असा उपक्रम घेण्यात येत आहे

शासकीय योजनांसाठी उपयुक्त

नागपूर विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी म्हणाले की,राज्यात सिंगल स्क्रिन संपत चालले आहे. दुर्गम आणि अतिदुर्गम भागात एका दिवसात हे एमडीएमटी उभारता येते. यातून शासकीय योजनांचा प्रचार प्रसार करण्यासोबत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांचेही मार्गदर्शन करता येते. सध्या प्रायोगिक तत्वावर उपयोग करू. लोकांचा प्रतिसाद पाहून प्रकल्प पुढे न्यायचा की नाही हे ठरवू.

बातम्या आणखी आहेत...