आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दारू विक्रीच्या वादातून युवकाचा खून:नागपूर निलडोह येथे युवकावर धारधार शस्त्रांनी केले वार; अल्पवयीन आरोपी पोलिसांच्या ताब्यात

नागपूर19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर एमआयडीसी पोलिस स्टेशन निलडोह येथे एका 22 वर्षीय यूवकाची धारदार हत्याराने खून केल्याची घटना बूधवार 15 जून रोजी जुना निलडोहच्या मागच्या रस्त्यावर असलेल्या पुलाजवळ घडली. या खूना प्रकरणी पाेलिसांनी एका अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतल्याची माहिती आहे. चेतन अंकुश मोहर्ले (वय 22) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

मृत चेतन अंकुश मोहर्ले
मृत चेतन अंकुश मोहर्ले

दारू विक्रीच्या वादातून युवकाचा खून

चेतनच्या नावाने एमआयडीसी पोलिस ठाण्यात काही गुन्हे दाखल आहेत. या परिसरात तो अवैध दारू विक्री करायचा. तर अल्पवयीन आरोपीही अवैध दारू विक्री करायचा. घटनास्थळाच्या बाजूलाच अवैध दारू विक्रीचा गुत्ता आहे. बुधवारी रात्री चेतन व आरोपी यांच्यात दारूच्या देवाणघेवाण वरून वाद झाला. यात आरोपीने स्वतःजवळ असलेल्या चाकूने व लोखंडी दांड्याने चेतनवर वार केले व त्यानंतर तेथून फरार झाला. परिसरातील काही लोकांना चेतन जखमी अवस्थेत पडलेला दिसला. या घटनेबाबत एमआयडीसी पोलिसांना माहिती देण्यात आली. जखमीला तत्काळ जवळच्या लता मंगेशकर रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

आरोपी पोलिसांच्या ताब्यात

एमआयडीसी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याच वस्तीत राहणाऱ्या एका अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतले आहे. पुढील तपास महिला पोलिस निरीक्षक कल्याणी हुमने यांच्या मार्गदर्शनात सुरु आहे. शहरात पुन्हा गुन्हेगारी डोके वर काढीत आहे. फेब्रुवारीमध्ये एकही गुन्हा घडला नाही म्हणून स्वत:ची पाठ थाेपटून घेणाऱ्या पोलिसांसमोर वाढत्या गुन्हेगारीने चिंता वाढवली आहे.

बातम्या आणखी आहेत...