आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासध्या महाविकास आघाडीतील मंत्री आणि नेत्यांच्या मागे तपास यंत्रणांचा ससेमिरा सुरू आहे. केंद्रीय यंत्रणांच्या कारवाईवरुन महाविकास आघाडीमधील घटक पक्षाचे नेते केंद्र सरकारवर टीका करत आहेत. राममंदिर गोंदिया येथे कुणबी समाजाचे सभागृह, वसतीगृह आणि वाचनालयाच्या बांधकामाचे भूमिपूजन सोहळा पार पडला. यावेळी सभागृह, वाचनालय व वसतिगृह बांधण्यासाठी कोणी किती निधी दिला, याची यादी आयोजकांनी वाचली. यावेळी बोलताना "दान गुप्त ठेवा उघड करू नका नाही, तर ईडी मागे लागते', असे म्हणत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजप आणि तपास यंत्रणांना टोला लगावला आहे.
भाजप सरकार केंद्रीय तपास यंत्रणेचा दुरूपयोग करून देशामध्ये दहशत निर्माण करत आहे, तेव्हा सुप्रीम कोर्टाने सुमोटो याचिका दाखल करून हस्तक्षेप करण्याची मागणी नाना पटोले यांनी केली. देशातील लोकशाहीच धोक्यात आली असून आता मुख्य न्यायाधीशांनी यात हस्तक्षेप करावा, असेही ते म्हणालेसर्वोच्च न्यायालयाने ईडीच्या विरोधात सुमोटो याचिका दाखल करावी, अशी मागणी यावेळी पटोले यांनी केली. गोंदियातील कुनबी मेळाव्याच्या जाहीर सभेत ते बोलत होते.
भाजपने टिंगलटवाळी सोडावी -
भारतीय जनता पक्षाने देशातील जनतेला एप्रिल फुल बनवले आहे. दररोज देशातील जनता एप्रिल फुल बनून जगत आहे. ज्या घोषणा भाजपवाले करून केंद्रात सत्तेवर आले आहेत. त्या सर्व घोषणा विसरून त्यांनी जनतेला एप्रिल फूल बनवलं आहे. भाजपने आता दुसऱ्यांना नावे ठेवण्यात काही अर्थ नाही. भाजपा नेत्यांनी टिंगलटवाळी सोडून महागाई, बेरोजगारीवर चर्चा करावी, असा सल्ला नाना पटोले यांनी दिला.
विरोधकांना बोलवायची गरज नाही -
आज गुडी पाडव्याच्या निमित्ताने मुंबई मेट्रो 2 व 7 चे उद्घाटन आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले आहे. या पत्रिकेवर विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचा नाव नसल्याने भाजपकडून मविआ सरकारवर टीका करण्यात येत आहे. यावर हा एक प्रोटोकॉल असतो, त्यामध्ये विरोधकांना बोलवायची गरज नाही, असा टोलाही नाना यांनी भाजपला लगावला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.