आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाद:अजित पवारांनी चूक कबूल केली यातच सगळे काही आले; नाना पटोले म्हणाले - भाजपने नेहमीच लोकशाहीचा गळा घोटला

नागपूर19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

उद्धव ठाकरे यांच्या प्रमाणेच नाना पटोले यांनी विधानसभाध्यक्षपदाचा राजीनामा दिला नसता तर सरकार कोसळले नसते आणि आज तेच अध्यक्ष राहिले असते. त्यामुळे आमदारांच्या अपात्रतेचे प्रकरणही त्यांच्यासमोर सुनावणीसाठी आले असते. याने वेगळी कलाटणी मिळाली असती असे सांगितले जाते. मात्र, मी कोणालाही न सांगता, विश्वासात न घेता राजीनामा दिल्याचाही आरोप होतो. पण, मी संबंधितांना सांगूनच राजीनामा दिला होता अशी माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी "दिव्य मराठी'शी बोलताना दिली.

विधानसभा अध्यक्षांच्या अनुपस्थितीत उपाध्यक्षांना अधिकार असतो. तेच अध्यक्ष म्हणून काम पाहातात. आणि उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी अध्यक्ष म्हणून कामकाज पाहाताना आमदारांना अपात्र ठरवलेच आहे. मग अध्यक्षांचा प्रश्न येतोच कुठे, असा सवाल पटोले यांनी केला.

अध्यक्षपद काँग्रेसकडे होते. काँग्रेसने संग्राम थोपटे यांचे सुचवले होते. आमच्याकडे भरपूर उमेदवार होते. पण, अजित पवारांनी महाविकास आघाडीची चूक झाली हे कबूल केले आहे. काही लोक अकारण माझ्यावर खापर फोडण्याचे काम करीत आहे, असे ते म्हणाले.

महाविकास आघाडीकडून अध्यक्षांची निवड करण्यात उशीर झाल्याचे अजित पवारांनी मान्य केले आहे. मग यात काँग्रेसचा आणि इतरांच्या विरोधाचा प्रश्नच येत नाही. आम्ही अध्यक्षपदासाठी उमेदवार दिलेला होता असे पटोले म्हणाले होते. भाजपने नेहमीच लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम केले.

आताही त्यांनी तेच केले असे पटोले म्हणाले. सत्ता संघर्षाचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला. त्यात उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला नसता तर त्यांना परत बोलावता आले असते असे निरीक्षण नोंदवले. यावर मी काही बोलु शकत नाही. हा त्यांचा प्रश्न आहे.