आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादेशातील भाजप सरकार विरोधात लढणाऱ्या पक्षांना सोबत घेऊन जाण्याची काँग्रेसची भूमिका आहे. मात्र कोणाला जबरदस्तीने सोबत न्यायचे नाही, अशी भूमिका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी येथे माध्यमांशी बोलताना मांडली. त्याचा त्रास राहुल गांधी, सोनिया गांधी यांना भोगावा लागत आहे, असे ते म्हणाले.
बस्स..विषय संपला
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी उत्तर दिल्याने संजय राऊतांवर मला काही बोलायचे नाही. त्यांनी सोनिया गांधी किंवा राहुल गांधी यांच्यावर बोलताना तारतम्य ठेवावे एवढेच माझे म्हणने आहे. हा विषय आता संपला आहे.
..तर मुंबई तोडणे नाही तर काय?
नाना पटोले यांनी वज्रमुठ सभा पावसामुळे होणार नसल्याचे सांगितले आहे. पावसाने वाताहत झाली आहे आणि नैसर्गिक वातावरण असल्याने सभेपूर्वी तीनही पक्षाची बैठक होईल. या बैठकीत सभेबाबत निर्णय होईल. सभा घ्यायचे ठरले तर तातडीने सभा होईल. सामन्यात जे छापून आले त्यावर प्रतिक्रिया देण्याची गरज नाही. मुंबईतले एकेक करून उद्योग बाहेर नेले जात आहे. हे मुंबई तोडणे नाहीतर मग काय आहे? संपूर्ण मुंबई तोडण्याचे काम सुरू आहे. बिकेसीची जागा बुलेट ट्रेनसाठी राखीव केली आहे असेही नाना पटोले म्हणाले.
राहुल गांधींमध्ये माणुसकी
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सुप्रिया सुळे यांच्याशी फोनवर संपर्क साधून शरद पवार यांनी दिलेला राजीनामा संदर्भात संवाद साधला, ही माणुसकी आहे. आपल्या सहकारी पक्षात काही घडले तर माहिती घेणे आणि आपल्या भावना व्यक्त करणे हीच माणुसकी आहे. राहुल गांधींमध्ये ती आहे. म्हणून त्यांनी फोन केला.
फडणवीसांची चाणक्यनीती
ते वेगळे रसायन आहे हे फडणवीस म्हणाले. पण फडणवीस चाणक्य नीती बोलतात. कर्नाटकमध्ये भाजप निवडणूक हरत असल्याने त्यांनी संजय राऊतांवर तसे वक्तव्य केले असेल, असे नाना पटोले म्हणाले.
पक्ष वेगळे पण विचारधारा एक
काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे दोन वेगळे पक्ष असले तरी हे दोन्ही पक्ष शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारावर काम करतात. त्यामुळे शाहू, फुले, आंबेडकर यांचा अपमान करणाऱ्या पक्षासोबत राष्ट्रवादीचे कोणतेही नेते जातील असे मला वाटत नाही, असेही नाना पटोले म्हणाले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.