आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअयोध्येत रामाच्या दर्शनासाठी काेट्यवधी लोक जातात. तेव्हा ते कोणतेही जाहीरातबाजी करीत नाही. फक्त महाराष्ट्रातील लोक जातात तेव्हाच जाहीरातबाजी केली जाते. ती त्यांच्यासाठी चांगली असेल. पण, लौकिकदृष्ट्या चुकीची आहे अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी येथे माध्यमांशी बोलताना केली.
धार्मिक पर्यटनाला जाण्यात काहीच गैर नाही. पण त्यासाठी मोठ्या प्रमाणावर जाहीरातबाजी करण्याची गरज नव्हती. राज्यात पाच जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे शेतकरी चिंतेत सापडला आहे. असे असताना अशी जाहीरातबाजी करणे चांगले नाही.
काँग्रेसची लढाई अदानी वा मोदींसोबत नाही. तर जनतेच्या पैशाच्या लुटी विरोधात आहे. त्यामुळे जेपीसीद्वारे चौकशी हवी. सामान्य जनतेचा पैसा गेला कुठे, हे कळायला हवे. पंतप्रधान जेपीसीवर बोलायला का तयार नाही असा सवाल पटोले यांनी केला. रामाच्या जन्माचा पुरावा मागणारे आज घरी बसले आहे. आणि रामाला मानणारे आज सत्तेत बसले आहे. तेच पुढे देशावर राज्य करतील असे फडणवीस यांनी म्हटले आहे. पण, एकेकाळी काँग्रेसमध्ये असताना प्रभू रामाचा विरोध करणारे बहुतांश नेते आता भाजपात आहे. किमान ६० ते ६५% भाजपाचे खासदार मूळ काँग्रेसी आहेत.
भाजपात आले की रामभक्त आणि काँग्रेसमध्ये असले की राम विरोधी ही भाजपाची दुतोंडी भूमिका योग्य नाही. रामाच्या नावाने श्रद्धेचा फायदा घेत जनतेकनडून पैसे लुटायचे आणि त्याचा हिशोबही द्यायचा नाही, अशा लोकांनी असे बोलू नये. रामभक्त कोण आहेत हे जनतेला माहित आहे, असा टोला फडणवीसांना लावला. नागपुरातील वज्रमुठ सभेसाठी भाजपा विरोध का करीत आहे हे समजत नाही. त्यांच्या विरोधाला घाबरून सभा होणार नाही, असे नाही. सभा होणारच, असे पटोलेंनी सांगितले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.