आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाना पटोलेंचा खळबळजनक दावा:अजित पवारांनीच सत्यजित तांबेंच्या घरातील भांडणे चव्हाट्यावर आणली, माझ्याकडेही खूप मसाला

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सत्यजित तांबेंनी केलेल्या गंभीर आरोप महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

माझ्याकडेही खूप मसाला आहे. वेळ आली की सर्व बाहेर काढणार, असा इशारा नाना पटोले यांनी दिला आहे.

तसेच, अजित पवारांनीच सत्यजित तांबेंच्या घरातील भांडणे चव्हाट्यावर आणली, असा खळबळजनक आरोपही नाना पटोले यांनी केला.

तुम्हीच समजून घ्या

नाना पटोले म्हणाले, घरातील भांडणे घरातच सोडवा, बाहेर आणू नका, असे मी यापूर्वीही म्हणालो होतो. मात्र, नाशिक पदवीधर निवडणुकीत सर्वपक्षीय हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. मविआ उमेदवाराची मते आम्हीच मारली, असे अजित पवार म्हणाले आहेत. त्यावरुनच तुम्ही समजून घ्या.

अजित पवारांवर खळबळजनक आरोप

पुढे नाना पटोले म्हणाले, सत्यजित तांबेंच्या उमेदवारीबाबत मी बाळासाहेब थोरातांशी बोललो आहे, नाना पटोलेंशी बोललो आहे, असे अजित पवारच सांगत फिरत होते. तेव्हाच मी घरातील भांडणे घरात सोडवा, असे म्हणालो होतो. मात्र, नंतर नाशिक पदवीधर निवडणुकीतील मविआ उमेदवारीची मते आम्हीच मारली, असे अजित पवार म्हणाले. अजित पवार आमचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्याविषयीही बरेच काही बोलले. मविआतील घटक पक्ष असूनही त्यांनी असे वक्तव्य केले आहे.

सत्यजित तांबेंच्या आरोपांवर मौन

नाना पटोले यांनीच अखेरच्या क्षणी मला चुकीचे एबी फॉर्म दिले. तसेच, कुटुंबाच्या बदनामीचे षड्यंत्र रचले, असे गंभीर आरोप आज सत्यजित तांबेंनी नाना पटोलेंवर केले आहेत. त्यावर मात्र नाना पटोलेंनी अनपेक्षिरित्या मौन बाळगले. नाना पटोले म्हणाले, सत्यजित तांबेंवर पक्षाचे प्रवक्तेच बोलतील. मी काँग्रेसचा महाराष्ट्राचा प्रमुख आहे. मी कोणत्या विषयावर बोलायचे, हेदेखील महत्त्वाचे आहे. सत्यजित तांबेंवर पक्षाचे प्रवक्तेच बोलतील. देशात अदानीचा घोटाळा, शेतकरी व सामान्यांचे अनेक प्रश्न आहेत, त्यावर मी बोलणे अधिक उचित राहील.

SBI, LICसमोर आंदोलन करणार

नाना पटोले म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाने 70 वर्षांत कमावलेली संपत्ती उद्योगपती मित्र अदानीला देण्याचा सपाटा लावला आहे. एवढ्यावरच न थांबता त्यांनी देशातील जनतेने मोठ्या कष्टाने कमावलेला व भविष्याची तरतूद म्हणून SBI, LIC मध्ये गुंतवलेले हजारो कोटी रुपये ही अदानीच्या कंपन्यांना दिले. आता हे हजारो कोटी रुपये बुडण्याची भिती निर्माण झाली आहे. तरीही केंद्र सरकार मूग गिळून गप्प बसले आहे. ‘अदानी’ समूहातील गैरकारभाराची चौकशी करावी व जनतेचा पैसा सुरक्षित रहावा, यासाठी काँग्रेस पक्ष सोमवार 6 फेब्रुवारी रोजी एसबीआय व एलआयसीच्या राज्यातील सर्व कार्यालयांसमोर आंदोलन करणार आहे.

संबंधित वृत्त

सत्यजित तांबेंचे नाना पटोलेंवर गंभीर आरोप:अखेरच्या क्षणी मला चुकीचे एबी फॉर्म दिले, कुटुंबाविरोधात षड्यंत्र रचले; अपक्षच राहणार

सत्यजित तांबे यांनी आज पत्रकार परिषदेत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांच्यावर गंभीर आरोप केले. तसेच, आपण यापुढेही अपक्षच राहणार, असेही सत्यजित तांबे यांनी स्पष्ट केले. ऐन निवडणुकीआधी मला चुकीचे एबी फॉर्म दिले. नाशिक पदवीधर निवडणुकीऐवजी मला औरंगाबाद आणि नागपूर शिक्षक पदवीधर मतदरासंघाचे एबी फॉर्म देण्यात आले होते, असा आरोप सत्यजित तांबे यांनी केला आहे. वाचा सविस्तर

बातम्या आणखी आहेत...