आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागपूर:सध्या स्वबळाचा विषय नाही, परिस्थिती पाहून निर्णय घेऊ; दिल्लीत जाताच नाना पटोलेंची नरमाईची भूमिका

नागपूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसह आगामी सर्वच निवडणुका स्वबळावर लढवण्याचा नारा देऊन राज्यात खळबळ उडवून देणारे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिल्लीत जाताच नरमाईची भूमिका घेतली . राज्यातील जिल्हा परिषदांसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्थानिक परिस्थिती आणि गरज पाहून लढवण्यात येतील, अशी भूमिका त्यांनी शुक्रवारी मांडली.

“दिव्य मराठी’शी बोलताना पटोलेंनी सांगितले की, लोकसभेच्या निवडणुका २०२४ मध्ये आहेत. त्यामुळे आतापासून स्वबळाचा काही विषय नाही. काँग्रेसचे सरचिटणीस वेणुगाेपाल व महाराष्ट्राचे प्रभारी एस. के. पाटील यांच्यासोबत झालेल्या चर्चेत स्वबळाचा विषय नव्हता. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काय धोरण असावे याबद्दल चर्चा झाली. जि. प. निवडणुकीत ओबीसी आरक्षणाचा प्रश्न आहे.

नजीकच्या काळात महापालिका निवडणुका आहेत. या निवडणुकीत स्थानिक परिस्थिती पाहून निर्णय घेऊ. जिथे राष्ट्रवादी काँग्रेस किंवा शिवसेनेसोबत आघाडीची गरज असेल तिथे आघाडी करू तसेच जिथे स्वबळावर गरजेचे असेल तिथे स्वतंत्र लढू.

बातम्या आणखी आहेत...