आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राणेंना धक्का:कोकणात शिवसेनेच्या पाठिंब्यावर काँग्रेसची सरशी राणेंच्या बालेकिल्ल्यात काँग्रेसने रोवला झेंडा

नागपूर6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • विदर्भात महाविकास आघाडीचा झेंडा; 7 जागी काँग्रेस, पाच ठिकाणी सेना

विदर्भातील अमरावती, बुलडाणा, यवतमाळ आणि गडचिरोली जिल्ह्यातील १५ नगरपंचायतींच्या अध्यक्ष-उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने बाजी मारली. काँग्रेसचे ७ ठिकाणी नगराध्यक्ष विराजमान झाले, तर ५ ठिकाणी शिवसेनेला विजय मिळाला. युवा स्वाभिमान, प्रहार जनशक्ती आणि आदिवासी विद्यार्थी संघाने एका ठिकाणी विजय मिळवला. नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीतही भाजपला फटका बसला. गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा नगरपंचायतीत बहुमत असूनही बंडखोरीमुळे भाजप उमेदवाराचा पराभव झाला. एकूणच विदर्भात महा विकास आघाडीची सरशी झाल्याचे चित्र तरी सध्या दिसत आहे. आता भाजपला विदर्भात मेहनत करावी लागणार आहे.

वाशीत भाजप, लोहाऱ्यात सेना-राष्ट्रवादीच्या नगराध्यक्षा
उस्मानाबाद जिल्ह्यात वाशी आणि लोहारा नगरपंचायतीच्या निवडणुका पार पडल्या. यांच्या नगराध्यक्षांची सोमवारी निवड करण्यात आली. यात वाशी नगरपंचायतीवर भाजपचे वर्चस्व असून तेथे भाजपच्या विजया गायकवाड नगराध्यक्षा, तर उपनगराध्यक्ष म्हणून सुरेश कवडे यांची निवड केली. तसेच लोहाऱ्यात शिवसेना आणि राष्ट्रवादीने एकत्र येत निवडणुका लढल्या होत्या. यात नगराध्यक्षा म्हणून शिवसेनेच्या वैशाली खराडे, तर उपनगराध्यक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे अयुब शेख यांची निवड झाली.

बातम्या आणखी आहेत...