आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PM नरेंद्र मोदींच्या हस्ते समृद्धी महामार्गाचे उद्घाटन:एकनाथ शिंदेंच्या पाठीवर दिली कौतुकाची थाप, 'मेट्रो टप्पा 2'चे भूमिपूजन

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते 'नागपूर मेट्रो टप्पा 1'चे लोकार्पण

समृद्धी महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. महामार्गाचे उद्घाटन केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. तसेच, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचेही कौतुक केले.

समृद्धीच्या लोकार्पणासाठी आज सकाळीच पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपुरात दाखल झाले. नागपूर विमानतळावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे स्वागत केले.

वंदे भारत एक्सप्रेला हिरवा झेंडा

पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपूर विमानतळावरावरून सर्वप्रथम नागपूर रेल्वेस्थानकावर पोहोचले. येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वंदे मातरम एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला. नागपूर ते बिलासपूर ही वंदे भारत एक्सप्रेस धावणार आहे. या एक्सप्रेसमध्ये प्रवाशांना सर्व अत्याधुनिक सुविधा देण्यात आल्या आहेत. देशात अशा रेल्वेंची संख्या आणखी वाढवण्याची केंद्र सरकारची योजना आहे.

विद्यार्थ्यांसोबत मेट्रोमधून प्रवास

त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फ्रिडम पार्क मेट्रो स्थानकापासून खापरी मेट्रो स्थानकापर्यंत मेट्रोमधून शालेय विद्यार्थ्यांसोबत प्रवास केला. येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'नागपूर मेट्रो टप्पा 1'चे लोकार्पण केले. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘नागपूर मेट्रो टप्पा-२’ ची पायाभरणीही केली. त्यानंतर नरेंद्र मोदी यांनी नागपूर आणि शिर्डीला जोडणाऱ्या समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण केले. (समृद्धी महामार्गाचा 'अथः ते इति' प्रवास; पाहा 10 ग्राफिक्समध्ये)

एम्स रुग्णालयाचे लोकार्पण

समृद्धी महामार्गाचे लोकार्पण केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'एम्स नागपूर' रुग्णालयाचे लोकार्पण केले. देशभरातील आरोग्य पायाभूत सुविधा बळकट करण्यात हे महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे. जुलै 2017 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच या रुग्णालयाची पायाभरणी केली होती. या रुग्णालयाची स्थापना प्रधानमंत्री स्वास्थ्य सुरक्षा योजना या केंद्रीय योजनेअंतर्गत करण्यात आली आहे. अद्ययावत आणि सुसज्ज एम्स एम्स नागपूर हे 1575 कोटी रुपयांहून अधिक खर्च करून विकसित करण्यात आले आहे. एम्स नागपूर रुग्णालय हे बाह्य रुग्ण विभाग, आंतररुग्ण विभाग, निदान सेवा, शस्त्रक्रिया विभाग आणि वैद्यकशास्त्रातील सर्व प्रमुख विशेष आणि सुपरस्पेशालिटी विषयांचा समावेश असलेले 37 विभागांचे अत्याधुनिक सुविधा असलेले रुग्णालय आहे.

विविध प्रकल्पांची पायाभरणी

याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नागपुरात आज एका जाहीरं कार्यक्रमात 1500 कोटींहून अधिक खर्चाच्या प्रकल्पांचे लोकार्पण केले. राष्ट्रीय वन हेल्थ संस्था (एनआयओ ), नागपूर आणि नागपुरातील नाग नदी प्रदूषण निर्मूलन प्रकल्पाची पायाभरणी मोदींनी केली. याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चंद्रपूर येथील केंद्रीय पेट्रोकेमिकल्स अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान (सीआयपीईटी) संस्थेचं उद्घाटन केले. त्याचबरोबर 'हिमोग्लोबिनोपॅथी संशोधन, व्यवस्थापन आणि नियंत्रण केंद्र, चंद्रपूर'चे लोकार्पणही करण्यात आले.

महाराष्ट्राच्या विकासाचे 11 तारे, वाचा काय म्हणाले मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्घाटन करत असलेल्या प्रकल्पांचे महत्त्व

1) समृद्धी महामार्ग : नागपूर ते शिर्डी

नागपूर आणि शिर्डीला जोडणाऱ्या 520 किलोमीटर लांबीच्या समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार आहेत. समृद्धी महामार्ग किंवा नागपूर-मुंबई सुपर कम्युनिकेशन द्रुतगती मार्ग प्रकल्प हा देशभरातील कनेक्टिव्हिटीसाठी महत्वाचा आहे. सुमारे 55 हजार कोटी रुपये खर्च करून बांधला जात असलेला 701 किमीचा हा द्रुतगती मार्ग हा भारतातील सर्वात लांब द्रुतगती मार्गांपैकी एक आहे. महाराष्ट्रातील 10 जिल्हे आणि अमरावती, औरंगाबाद आणि नाशिक या प्रमुख शहरी क्षेत्रांमधून जातो. या द्रुतगती मार्गामुळे लगतच्या इतर1 4 जिल्ह्यांची संपर्क सुविधा सुधारण्यास मदत होणार आहे. विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र या प्रदेशांसह राज्यातील सुमारे २४ जिल्ह्यांना विकासाच्या महामार्गावर आणणारा हा प्रकल्प आहे.

PHOTOS नयनरम्य 'समृद्धी'चे:नागपूर ते शिर्डी या पहिल्या टप्प्यातील महामार्गाची संपूर्ण झलक, मार्गावर जाण्यासाठी 20 इंटरचेंजेस

2) नागपूर मेट्रो
नागरी वाहतुकीमध्ये क्रांती घडवून आणणारे आणखी एक पाऊल असलेला ‘नागपूर मेट्रोचा पहिला टप्पा’ पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राष्ट्राला समर्पित करणार आहेत. खापरी मेट्रो स्थानकावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी खापरी ते ऑटोमोटिव्ह स्क्वेअर (ऑरेंज लाइन) आणि प्रजापती नगर ते लोकमान्य नगर (एक्वा लाइन) या दोन मेट्रो रेल्वेला हिरवा झेंडा दाखवतील. नागपूर मेट्रोचा पहिला टप्पा 8650 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च करून विकसित करण्यात आला आहे. 6700 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या माध्यमातून विकसित होणाऱ्या नागपूर मेट्रो टप्पा-२ ची पायाभरणीही पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार आहेत.

आज उघडणार समृद्धीचे महाद्वार:राष्ट्रीय वाहतुकीत 6 टक्के वाटा उचलणार; महामार्गालगतच्या 36 टक्के लोकसंख्येला फायदा होणार

बातम्या आणखी आहेत...