आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराविज्ञान काँग्रेसची संकल्पना 'महिलांच्या सक्षमीकरणासह शाश्वत विकासासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान' अशी आहे. पण, जीवन व्यवहाराच्या सर्वच क्षेत्रात महिलांनी आपल्या कार्य कर्तुत्वाचा ठसा उमटवला आहे. हे लक्षात घेता महिलांच्या सहभागातून विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे सक्षमीकरण केले पाहिजे असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे केले.
पंतप्रधानांच्या हस्ते मंगळवार 3 जानेवारी रोजी 108 व्या भारतीय विज्ञान काँग्रेसचे दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. आरटीएमएनयूच्या अमरावती मार्गावरील परिसरामध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
परिषदेच्या उद्घाटन सोहळ्याला महाराष्ट्राचे राज्यपाल आणि महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठांचे कुलपती भगतसिंग कोश्यारी, केंद्रीय मंत्री आणि आरटीएमएनयू शताब्दी सोहळ्याच्या सल्लागार समितीचे अध्यक्ष व केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, विज्ञान आणि तंत्रज्ञान आणि पृथ्वी विज्ञानमंत्री डॉ जितेंद्र सिंह, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुभाष आर. चौधरी आणि इंडियन सायन्स काँग्रेस असोसिएशन (आयएससीए), कोलकाताच्या सरचिटणीस डॉ. विजय लक्ष्मी सक्सेना यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना मोदी, यांनी भारत स्टार्टअप इको सिस्टिममध्ये जगातील प्रथम तीन देशात आहे. भारतीय विज्ञान परिषदेच्या थिमची जगभरात चर्चा आहे. जगाचे भविष्य शाश्वत विकासासोबतच सुरक्षित आहे. परिषदेने शाश्वत विकासाला महिला सक्षमीकरणासोबत जोडले आहे. व्यावहारिकदृष्ट्याही हे दोन विषय एकमेकांशी जुळलेले आहे. आज विज्ञानाच्या माध्यमातून महिलांचे सक्षमीकरण करावे एवढाच विचार नाही. तर महिलांच्या सहभागातून विज्ञानाचेही सक्षमीकरण करावे. आणि विज्ञान व संशाेधनाला अधिक गतिमान करणे हे आमचे उद्दिष्ठ आहे असे मोदींनी स्पष्टपणे सांगितले.
आता भारताला जी - 20 परिषदेचे यजमानपद भूषविण्याची जबाबदारी मिळाली आहे. जी - 20 परिषदेच्या प्रमुख विषयांतही महिलांच्या नेतृत्वात विकास हा प्रमुख विषय आहे. मागील आठ वर्षात भारताने प्रशासनापासून समाज आणि अर्थव्यवस्थेपर्यत अनेक लक्षणीय कामे केली आहे. आज भारतात मुद्रा योजनेच्या माध्यमातून लहान उद्योग असो वा व्यवसायांत भागीदारी असो किंवा स्टार्टअपमधील लिडरशीप असो प्रत्येक ठिकाणी महिलांनी आपल्या कार्य कर्तुत्वाचा ठसा उमटवला आहे.
महिलांचा वाढता सहभाग समाज प्रगती करीत असल्याचे लक्षण आहे. सोबतच विज्ञानही प्रगती करीत असल्याचे मोदींनी आवर्जुन सांगितले. भविष्यात वैज्ञानिक आणि उद्योगांना सोबत काम करावे लागेल. तसेच संशोधन आणि विकासाला प्रोत्साहन द्यावे लागेल. वैज्ञानिक आणि संशोधकांनी भविष्यातील गरजा लक्षात घेऊन काम करावे असे आवाहन मोदींनी केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.