आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई-नागपूरला जोडणाऱ्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या नागपूर-शिर्डी या 520 किमीच्या पहिल्या टप्प्याचे 11 डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे.
रविवारी पंतप्रधान शिवमडका या समृद्धी महामार्गाच्या आरंभ बिंदुपासून ते वायफड या पूर्वीच्या सभास्थानापर्यत सुमारे साडे दहा किमीची पाहणी करणार असल्याची माहिती रस्ते विकास महामंडळाचे एम.डी. राधेश्याम मोपलवार यांनी दिली. या प्रवासासाठी त्यांना 8 मिनिटे लागतील असे मोपलवार यांनी सांगितले.
शिवमडका या समृद्धी महामार्गाच्या आरंभ बिंदुपाशी 18 एकर परिसरात एक मोठा चौक तयार केला आहे. या चौकाला 930 किलो मीटर म्हणजे साधारणत: 1 किमी प्रदक्षिणा करावी लागेल. नागपूर, अमरावती आणि अमरावतीकडून येणारे मार्ग या चौकात एकत्र येतात. आणि इथूनच पुढे मुंबईच्या दिशेने प्रवास सुरू होतो. दारात जशी रांगोळी असते. तसा रांगोळी पॅटर्नवर चौक डेव्हलप केला आहे. स्थानिक झाडाच्या प्रजाती लावलेल्या आहे.
कार्यक्रम स्थळात बदल करण्यात आला आहे. पूर्वी हा कार्यक्रम महामार्गावरील वायफड टोलनाक्याजवळ नियोजित होता. दहा ते पंधरा हजार नागरिक बसू शकतील अशी व्यवस्था केली जाणार होती. आता कार्यक्रम स्थळात बदल करण्यात आला आहे. मिहान मधील एम्स रुग्णालयाच्या मागच्या भागात मुख्य कार्यक्रम होणार आहे. वायफड लोकांना दूर पडले असते. खापरी रेल्वेस्थानकापासून वायफड आठ ते दहा किमी आहे. त्यामुळे एम्सच्या मागील मैदान निवडण्यात आले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याची जय्यत तयारी सुरू आहे. रविवारी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी या दौऱ्याची आढावा घेत शिर्डीपर्यतच्या मार्गाची पाहणी केली. त्यापूर्वी उपमुख्यमंत्र्यांनी कार्यक्रम स्थळांची पाहणी केली. या दौऱ्यात पंतप्रधानांच्या हस्ते समृध्दी महामार्गाच्या उद्घघाटनासह मेट्रो, एम्सचे लोकार्पण, वंदेमातरम रेल्वे आदी इतर अनेक प्रकल्पांचे लोकार्पण होणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.