आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टाटा समूह मिहानमध्ये गुंतवणूक करण्यास तयार:नितीन गडकरी यांना लिहिलेल्या पत्रात नटराजन चंद्रशेखर यांची हमी

नागपूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

टाटा समूह मिहान मध्ये गुंतवणूक करण्यास तयार असल्याचे टाटा सन्सचे अध्यक्ष नटराजन चंद्रशेखर यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पत्र पाठवून सांगितले आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी टाटा सन्सचे अध्यक्ष चंद्रशेखरन यांना पत्र पाठवून नागपुरातील मिहानमध्ये गुंतवणुकीची मोठी संधी असल्याचे सांगत त्यांचे लक्ष वेधले होते.

टाटा सन्सच्या विस्तारासाठी टाटा आवश्यक पायाभूत सुविधा मिहानमध्ये उपलब्ध आहेत. महामार्ग, रेल्वे तसेच विमानसेवा उपलब्ध आहे. त्यामुळे टाटा समुहातर्फे टाटा स्टिल , टाटा मोटर्स, टायटन इंडस्ट्री , व्होल्टास लिमिटेड असे विविध प्रकल्प मिहानमध्ये उभारले जाऊ शकतात असे गडकरी यांनी पाठवलेल्या प्रत्रात सांगण्यात आले होते.

मिहानमध्ये उद्योग पायाभरणीच्या संधीबाबत विदर्भ इकोनाॅमिक डेव्हलपमेंट काऊंसिल, वेदने एक आराखडा तयार केला आहे. लवकरच आमची टीम नागपूर येथे येऊन मिहान येधील उद्योग विस्ताराच्या संदर्भात सर्व्हे करेल असे टाटा सन्सचे अध्यक्ष नटराजन यांनी पत्रात सांगतिले आहे. टाटा समूहाचा मिहान मधील प्रस्तावित एअरबस प्रकल्प गुजरात मध्ये गेल्यामुळे आरोप प्रत्यारोप होत असताना नागपूर साठी दिलासादायक बातमी पुढे आली आहे.

नितीन गडकरींना लिहिलेल्या पत्रात नटराजन यांनी गडकरींचे आभार मानले आहे. टाटा समूहासाठी नागपुरातील विविध व्यवसाय संधींबद्दल मी तुमच्या पत्रातील माहिती पाहिली आहे. मी रस्ते, रेल्वे आणि हवाई मार्गाने चांगल्या प्रकारे जोडलेल्या भागात एसईझेड आणि बिगर एसईझेड जमिनीची उपलब्धता देखील लक्षात घेतली आहे, असे नटराजन यांनी पत्रात नमुद केले आहे. आमची टीम निश्चितपणे विदर्भ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट (VED) कौन्सिलच्या सदस्यांच्या संपर्कात राहिल. कारण आम्ही संपूर्ण ग्रुपमध्ये गुंतवणुकीच्या नवीन संधींचे मूल्यांकन करतो, असे नटराजन यांनी पत्रात म्हटले आहे. राज्यातील एका पाठोपाठ एक प्रकल्प गुजरातला चालल्याने सरकार विरोधात असंतोष व्यक्त होत असून विरोधकांनी टिकेची झोड उठवली आहे. शेवटी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रपरिषद घेऊन खुलासा करावा लागला.

बातम्या आणखी आहेत...