आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गिनीज बुकात रेकाॅर्डसाठी प्रयत्न:राष्ट्रीय महामार्ग अमरावती-अकोला दरम्यान 48 तासांतच बनवला 34 किलोमीटरचा डांबर रस्ता

नागपूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती ते अकोला दरम्यान राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने 17.34 किमीचा दोन पदरी (म्हणजेच 34.74 किमी एकपदरी) अखंड डांबरीकरण रस्ता 48 तासात पूर्ण केला आहे. या रस्त्याच्या बांधकामाची गती पाहता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या व राजपथ इन्फ्राकॉन या कंपनीच्या चमूला विश्वविक्रमासाठी ट्विटद्वारे शुभेच्छा दिल्या आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या आझादी का अमृतमहोत्सवानिमित्त राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अमरावती ते अकोला या दरम्यान राष्ट्रीय महामार् 53 या विभागात सिंगल लेन 75 किमी अखंड डांबरीकरणाचा महामार्ग बांधण्याचा प्रयत्न करीत आहे. या कामाच्या पाहणीसाठी तांत्रिक सल्लागाराची नियुक्ती करण्यात आली असून त्यांनी पाहणी केल्यानंतर याबाबत गडकरींना माहिती दिली. यात 17.34 किमी (2 लेन पेव्हड शोल्डर) दोन पदरी म्हणजे 34.74 किमी एक पदरी अखंड डांबरीकरण रस्ता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व कंत्राटदाराची चमूने 48 तासात केला आहे.

कामाच्या ठिकाणी 'गिनीज बुक'चे प्रतिनिधी

गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचे प्रतिनिधी प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी असून कामाच्या सर्व क्रिया प्रक्रियांची नोंद करतात, असे सांगून गडकरी म्हणाले, ''मला गुणवत्ता अहवाल प्राप्त झाला आहे. रस्ता बांधकामाचे प्रमाण व अन्य मापदंड पाहता संपूर्ण देशाला आनंदी व अभिमान वाटेल अशा विश्वविक्रमाचा समावेश या कामाचा होईल अशी मला आशा आहे.''

बातम्या आणखी आहेत...