आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नागपूर:अबूजमाडमध्ये उद्ध्वस्त केला नक्षलींचा शस्त्रांचा कारखाना; सी-60 कमांडोजची 48 तासांची कारवाई, एक जवान जखमी

नागपूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

भामरागड तालुक्यात छत्तीसगडच्या सीमेलगत असलेल्या अहेरी भागातील अतिदुर्गम अबूजमाडमध्ये गडचिरोली पोलिस आणि सी-६० कमांडोजनी केलेल्या कारवाईत नक्षल्यांचा शस्त्रनिर्मिती कारखाना उद्ध्वस्त केला. ४८ तास चाललेल्या चकमकीत पायाला गोळी लागल्याने एक जवान जखमी झाला. या कारवाईत सुमारे ७० अधिकारी व जवान सहभागी झाले होते. या चकमकीत नक्षल्यांकडून काेणी जखमी झाल्याबद्दल माहिती मिळू शकली नाही. दरम्यान, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधानसभेत केलेल्या निवेदनात ७० जवानांनी कारवाईत नक्षलवाद्यांचा शस्त्रांचा कारखाना उद्ध्वस्त केल्याची माहिती दिली आहेे.

गृहमंत्री देशमुख म्हणाले, आपल्या जवानांनी केलेली ही कामगिरी अभिमानास्पद असून ७० जवानांनी ४८ तासांच्या या कारवाईत नक्षलवाद्यांच्या कोअर एरियामध्ये जाऊन शस्त्रास्त्रांचा कारखाना उद्ध्वस्त केला. या कारवाईत एक जवान जखमी झाल्याचे त्यांनी सांगितले. यासंदर्भात गडचिरोली परिक्षेत्राचे पोलिस उपमहानिरीक्षक संदीप पाटील यांच्याशी संपर्क साधला असता जखमी जवानाच्या जिवाला कोणताही धोका नसल्याचे ते म्हणाले.

कोपर्शीच्या घनदाट जंगल परिसराने वेढलेल्या अबूजमाड येथे गडचिरोली पोलिस, सी-६० पथक व नक्षल्यांत चकमक सुरू होती. पोलिस कमांडो आणि नक्षलवादी यांच्यात दोन वेळा गोळीबार झाला. घटनास्थळ घनदाट जंगल पर्वतरांगांनी वेढलेला अबूजमाडचा परिसर आहे. रात्रीपासून या भागात गडचिरोली पोलिस दलाच्या सी-६० कमांडोचे नक्षलवाद्यांच्या विरोधात अभियान सुरू होते. नक्षलवाद्यांचा हल्ला जवानांनी परतवून लावला. मदतीसाठी गडचिरोली पोलिस दलाचे हेलिकॉप्टर रवाना झाल्याची माहिती आहे.

बातम्या आणखी आहेत...