आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संशयावरून तरुणावर हत्‍या:पोलिस खबऱ्या असल्याच्या संशयावरून नक्षलवाद्यांनी झाडली तरुणावर गोळी

गडचिरोली16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भामरागड तालुक्यातील अतिदुर्गम भागातील मर्दहुर गावचा २६ वर्षीय युवक आपल्या आयुष्याचे स्वप्न साकार करण्यासाठी गडचिरोली शहरात स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता. होळीच्या सणानिमित्त तो मर्दहुर या आपल्या गावी आला होता. गुरुवारी रात्री नक्षली गावात आले व तो युवक पोलिसांचा खबऱ्या असल्याच्या संशयावरून त्याची गोळी झाडून हत्या केली.

साईनाथ नरोटे (२६) असे हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव असून तो भामरागड तालुक्यातील मर्दहुर गावाचा रहिवासी होता. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनेचा पंचनामा केला. साईनाथ हा गडचिरोली येथे शिक्षण घेत स्पर्धा परीक्षेचीदेखील तयारी करत होता.

बातम्या आणखी आहेत...