आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अटक:नक्षल्यांच्या पेरमिली दलम सदस्य मंगरु मडावी यास अटक, 2 लाख रूपयांचे शासनाने जाहीर केले होते बक्षीस

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • या नक्षलवाद्यावर सामान्य निष्पाप नागरिकांच्या हत्या करणे तसेच पोलिस स्टेशनवर हल्ले करणे यासारखे हिंसक गुन्हे नोंद आहेत.

अहेरी पोलिस उपविभागाअंतर्गत येणाऱ्या पेरमिली उपपोस्टे हद्दीत गोपनिय सुत्रांकडून मिळालेल्या विश्वसनिय माहितीच्या आधारे गडचिरोलीचे विशेष अभियान राबवण्यात आले. पथकाच्या जवानांनी पेरमिली जंगल परिसरात नक्षल विरोधी अभियान राबवले. दरम्यान रात्री गस्त घालत असतांना नक्षल्यांच्या पेरमिली धर्माचा सदस्य मंगरु कटकु मडावी यास अटक करण्यात आली आहे. या नक्षलवाद्यावर सामान्य निष्पाप नागरिकांच्या हत्या करणे तसेच पोलिस स्टेशनवर हल्ले करणे यासारखे हिंसक गुन्हे नोंद आहेत.

नक्षल दृष्टया अतिसंवेदनशिल भामरागड तालुक्यातील नारगुंडा पोलिस मदत केंद्रांतर्गत विसामुंडी येथील रहीवासी असलेला मंगरु मडावी हा पेरमिली एलओएसच्या सदस्य पदावर भरती होऊन ॲक्शन टिम मेंबर म्हणुन कार्यरत होता. तसेच तो प्रतिबंधीत असलेल्या दंडकारण्य आदिवासी किसान मजदुर संघटनेचा वरिष्ठ कॅडर होता.

2021 मध्ये बुर्गीचे उपसरपंच रामा तलांडी याच्या खुनात तसेच बुर्गी पोलिस मदत केंद्रावरील हल्ल्यामध्ये त्याचा समावेश होता. त्याच्यावर 3 खुन, 1 चकमक असे एकुण 4 गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्या नक्षली कारवाया व नक्षली प्रसारास आळा घालण्याकरीता महाराष्ट्र शासनाने त्याच्यावर 2 लाख रुपयाचे बक्षीस जाहीर केले होते. याव्यतिरीक्त त्याचा आणखी किती गुन्ह्यांमध्ये सहभाग आहे याचा तपास गडचिरोली पोलिस दल करत आहे. अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांनी पत्रकार परिषदेत दिली.

बातम्या आणखी आहेत...