आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअखेर तब्बल 12 तासाच्या तुरुंगावासानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे तुमसर मोहाडी विधानसभा क्षेत्राचे आमदार राजू कारेमोरे यांची आज मंगळवारी सकाळी 9.15 वाजता सुटका झाली. पोलिस स्टेशनमध्ये जाऊन गोंधळ घालणे आणि पोलिसांना शिविगाळ करणे या आरोपांखाली त्यांना अटक करण्यात आली होती.
त्यांच्यावर 31 डिंसेबरच्या रात्री मोहाडी पोलिस स्टेशनमध्ये जाऊन गोंधळ घातल्याप्रकरणी विविध कलमाद्वारे गुन्हा दाखल करण्यात आले आहे. त्याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली होती. मोहाडी दिवाणी व फौजदारी न्यायालयाने आमदार राजू कारेमोरे यांना 15 जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्यामुळे त्यांना भंडारा तुरुंगात नेण्यात आले होते. मात्र, काही तासातच भंडारा सत्र न्यायालयाने आमदार कारेमोरे यांच्या वकिलांनी जिल्हा सत्र न्यायालयात त्यांच्या जामिनासाठी अर्ज सादर केला होता. त्यावर न्यायलयाने अंतरीम जामिन 15 जानेवारीपर्यंत मंजूर केला. मात्र, कारागृहाच्या वेळेत आमदार कारेमोरे यांच्या जमानतीचे कागदपत्र कारागृहात पोहचले नाही. त्यामुळे कारेमोरे यांना सोमवरला रात्र कारागृहात काढावी लागली.
यांची आज सकाळी तब्बल 12 तासाच्या तुरुंगवासानंतर सुटका करण्यात आली आहे. यावेळी आमदार राजू कारेमोरे यांनी पोलिसांच्या 50 लाख रुपये लुटमारी संदर्भात न्यायालयीन लढाई लढण्याचा निर्धार केला असल्याची माहिती दिली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.