आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अडीच महिन्यांच्या बाळासह आमदार सरोज अहिरे विधानभवनात:म्हणाल्या - माझ्या बाळाप्रमाणेच मला मतदारसंघातील समस्याही महत्त्वाच्या

नागपूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपुरात आजपासून सुरू झाले आहे. राष्ट्रवादीच्या आमदार सरोज अहिरे त्यांच्या अडीच महिन्यांच्या बाळाला घेऊन विधानसभेत दाखल दाखल झाल्या आहेत. माझ्या बाळाप्रमाणेच मला मतदारसंघातील समस्याही महत्त्वाच्या आहेत, असे यावेळी आमदार सरोज अहिरे यांनी म्हटले आहे.

सरोज आहिरे या 2019 मध्ये देवळाली मतदारसंघातून आमदार म्हणून विजयी झाल्या आहेत. मतदारसंघात जनतेशी नाळ असलेल्या आमदार म्हणून त्या सर्वत्र परिचित आहेत. राष्ट्रवादीच्या युवा आमदारांमध्येही त्यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. लोकप्रतिनिधी म्हणून जबाबदारी तर दुसरीकडे आई म्हणून जबाबदारी असे लोकप्रतिनिधी या निमित्ताने दिसून आले आहेत.

सरोज आहिरे म्हणाल्या?

राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार सरोज अहिरे म्हणाल्या की, मी आई आहेच. सोबत आमदारही आहे. त्यामुळे दोन्ही कर्तव्ये महत्त्वाची आहेत. बाळ माझ्याशिवाय राहू शकत नाही, तर मतदारसंघातील लोकांचे प्रश्नही महत्वाचे आहेत. त्यामुळे बाळाला घेऊन अधिवेशनाला यावे लागले, असे सांगताना कुटुंबीय बाळाला सांभाळतील त्याचवेळी मी सभागृहात मतदारसंघातील प्रश्न मांडणार आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

धनंजय मुंडेंकडूनही कौतुक

माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी ट्विट करत आमदार सरोज अहिरे यांचे कौतुक केले आहे. ते म्हणाले की, देवळालीच्या आमदार सरोज आहिरे ताई आज आपल्या अडीच महिन्यांच्या प्रशंसकला घेऊन विधिमंडळ अधिवेशनात सहभागी झाल्या आहेत.अवघ्या अडीच महिन्यांच्या बाळाला घेऊन कामकाजात सहभागी होऊन ताईंनी मतदारसंघाप्रति जबाबदारी आणि कर्तव्य परायणतेचे उत्कृष्ट उदाहरण प्रस्थापित केले आहे.

बातम्या आणखी आहेत...