आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आश्वासनांचे काय झाले?:चंद्रपुरात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे एप्रिल फुल आंदोलन, केक कापत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निषेध व्यक्त

चंद्रपूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मोदींच्या फसव्या आश्वासनांसह खोट्या विकासाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा असा केक कापत तरुणांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने आज अनोखे आंदोलन करण्यात आले.

मोदी साहेबांनी सांगितलेल्या विकासाच काय झाले ? देशातील तरुणांच्या रोजगाराच काय झाले? वर्षाकाठी दोन कोटी नोकऱ्या देण्यात येईल या आश्वासनाच काय झाले? पेट्रोल, डिझेल, गॅस च्या किमती कमी करणार या घोषणेचे काय झाले? अशा प्रश्नांची सरबत्ती करत तरुणांनी आंदोलन केले.

आश्वासनाचे काय झाले?

15 ऑगस्ट 2022 पर्यंत सर्वांना प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत सर्वांना स्वतःचे घर मिळणार या आश्वासनाचे काय झाले? अशा घोषणासह एप्रिल फुल च्या घोषणा देत, एप्रिल फुल म्हणजेच मोदी विकासाचा वाढदिवस म्हणून आज केक कापून केंद्र सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला.

यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष नितीन भटारकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे चंद्रपूर शहर जिल्हाध्यक्ष राजीव कक्कड, विधानसभा अध्यक्ष सुनील काळे, रायुकॉ शहर जिल्हाध्यक्ष अभिनव देशपांडे, भोलू भैय्या काचेला, माजी सरपंच अमोल ठाकरे आदी उपस्थित होते.