आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याबद्दल अपशब्द वापरून मोठी चूक केली आहे. धमकी पवारांनी नाही तर राणेंनी पवारांनी दिली आहे. त्यामुळे आता यापुढे त्यांनी सावध राहण्याची गरज आहे, असा इशारा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष दुनेश्वर पेठे यांनी येथे दिला.
नारायण राणे यांच्या वक्तव्याच्या निषेधार्ह आज नागपूर शहरातील व्हेरायटी चौकात आंदोलन करण्यात आले. राष्ट्रवादीच्या संतप्त कार्यकर्त्यांनी राणे आणि भाजपच्या विरोधात घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला. राणेंचा फोटो असलेल्या बॅनरवर जोडे मारून कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना घरची वाट अवघड होईल, असे म्हणत नारायण राणे यांनी धमकी दिली आहे. देशभरात पवारांबद्दल आदराचे स्थान आहे. पण राणेंनी अशी धमकी देऊन आपली लायकी दाखवली आहे. आता त्यांनी खबरदारी घ्यावी, असा इशारा राष्ट्रवादी कॉंग्रेसने दिला आहे.
शेकडो कार्यकर्त्यांनी बर्डी पोलिस स्टेशनला निवेदन दिले व राणेंवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्याची मागणी केली. नारायण राणे यांना नागपुरात पाय ठेवू देणार नाही, असा इशारा यावेळी देण्यात आला. याप्रसंगी सर्वश्री ईश्वर बाळबुधे, रमण ठवकर, लक्ष्मी सावरकर, नूतन रेवतकर, सतीश इटकेलवार आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.