आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सापत्न वागणूक:राष्ट्रवादीची भाजपला मदत; पटोलेंची पक्षश्रेष्ठींकडे तक्रार, अडीच वर्षांपासून काँग्रेसला सापत्न वागणूक

नागपूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या अडीच वर्षांपासून राष्ट्रवादीकडून काँग्रेसला सापत्न वागणूक मिळत आहे. पडद्यामागून भाजपला मदत करण्याची राष्ट्रवादीची भूमिका असल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी माध्यमांशी बोलताना केला. याबाबतची तक्रार पक्षश्रेष्ठींकडे करण्यात आली असून थोड्याच दिवसांत याचा निर्णय होईल, असे सूचक वक्तव्यही पटोले यांनी केले.

निधीवाटपाचा प्रश्न असेल वा भिवंडीतील काँग्रेस नगरसेवकांना राष्ट्रवादीत प्रवेश देणे असो, भंडारा व गोंदिया जिल्हा परिषदेत काँग्रेसला दगा दिला, अशी अनेक उदाहरणे सांगता येतील.भाजपला रोखण्यासाठी आम्ही सरकारमध्ये येण्यास तयार असल्याचे राष्ट्रवादीने सरकार स्थापनेवेळी सांगितले होते. पण, राष्ट्रवादी भाजपला ताकद देत असून काँग्रेसला अडचणीत आणत आहे. हा आमच्या नेत्या सोनिया गांधींचा अपमान आहे. आम्ही हे सहन करणार नाही. म्हणून पक्षश्रेष्ठींच्या कानावर या सगळ्या गोष्टी घातल्या. योग्य वेळी शरद पवारांशीही चर्चा करू. आम्ही सत्तेसाठी नव्हे तर विचाराने एकत्र आलो आहोत, असेही पटोले म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...