आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवीन संसद भवनाला डॉ. आंबेडकर संसद भवन नाव द्या:हिवाळी अधिवेशनात प्रश्न लावून धरणार - आमदार विकास ठाकरे

नागपूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्लीत सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पात बांधण्यात येत असलेल्या नवीन संसद भवनाला घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर संसद भवन असे नाव द्यावे, अशी मागणी करणारे निवेदन सामाजिक कार्यकर्ते प्रमोद तभाने यांनी आमदार विकास ठाकरे यांना दिले. तेलंगणा राज्याने असा ठराव पारित करून केंद्र सरकारला पाठवला आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्र सरकारनेही असा ठराव केंद्राकडे पाठवावा यासाठी आपण पाठपुरावा करू. तसेच हिवाळी अधिवेशनात हा प्रश्न लावून धरू असे आश्वासन आमदार विकास ठाकरे यांनी दिले.

दोनच दिवसांपूर्वी अशी मागणी डॉ. आंबेडकर महापरिनिर्वाण भूमी कमेटीचे राष्ट्रीय अध्यक्ष मंत्री इंद्रेश गजभिये यांनी नागपुरात केली होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतंत्र मतदारसंघाची मागणी केली होती. त्यावेळी एससी, एसटीच्या आरक्षित जागाही लोकसभा व विधानसभांच्या जागा सर्वसमावेशक करण्यात आल्या. मात्र, आज 70 वर्षानंतर त्या काही लाभ झालेला नाही. आजही आमची स्वतंत्र मतदारसंघाची मागणी आहे, असे गजभिये यांनी स्पष्ट केले होते. महापरिनिर्वाण भूमीबाबत कमेटीने केंद्राकडे पाच मागण्या केल्या आहे. या मागण्यांच्या पूर्ततेसाठी 6 डिसेंबरला दिल्लीत आंदोलन करण्यात येणार आहे.

सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पात नवीन संसद भवन, सामान्य केंद्रीय सचिवालय आणि राष्ट्रपती भवन ते इंडिया गेटपर्यत तीन किमी लांबीचा राजपथ हा सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाचा भाग आहे. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच भारत स्वत:चे संसद भवन बांधीत आहे. स्वतंत्र भारतात पहिली निवडणूक झाली त्यावेळी 489 लाेकसभेचे खासदार होते. आज 543 खासदार आहे. तर राज्यसभा सदस्य 245 आहे. वेगवेगळ्या मंत्रालयाची कार्यालये वेगवेगळ्या ठिकाणी असल्याने समन्वयात अडथळा येतो. नव्या संसद भवनात ही सर्व कार्यालये एकाच ठिकाणी राहाणार आहे.

बातम्या आणखी आहेत...