आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिस चौकशीत धक्कादायक माहिती:नितीन गडकरी धमकी प्रकरणातील दहशतवादी कनेक्शन पाहता NIA करणार तपास

नागपूर22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी धमकी प्रकरणात बेळगाव तुरुंगात बंद असलेला दहशतवादी संघटनेचा सदस्य अकबर पाशा याच्या सांगण्यावरूनच जयेश कांथा उर्फ शाकीरने गडकरी यांच्या कार्यालयात धमकीचा फोन केल्याची माहिती पोलिसांच्या तपासात पुढे आली होती. या प्रकरणातील दहशतवादी कनेक्शन लक्षात घेता या प्रकरणाचा तपास आता एनआयए करणार आहे. या प्रकरणातील दहशतवादी धागेदोरे शोधून काढण्यासाठी एनआयए सध्या नागपूर मध्यवर्ती कारागृहात असलेल्या जयेश कांथाची सखोल विचारपूस करणार आहे.

बेळगावच्या तुरुंगात कैद असताना जयेश कांथा याने १४ जानेवारी आणि २१ मार्च रोजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपुरातील जनसंपर्क कार्यालयात फोन केला होता. यावेळी त्याने पहिल्यांदा १०० कोटी आणि दुसऱ्यांदा १० कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. ही खंडणी न दिल्यास नितीन गडकरी यांना जीवे मारण्याची धमकी जयेश कांथाने दिली होती.

अकबर पाशा हा प्रतिबंधित पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचा (पीएफआय) सदस्य आहे. त्यामुळे एनआय बेळगाव कारागृहात बंद असलेल्या अकबर पाशासह कॅप्टन नसीर, फहद कोया रशीद मालाबारी त्याच्यासह इतर दहशतवादी साथीदारांची चौकशी करणार असल्याचे समजते.

बेळगावच्या तुरुंगात कैदेत असताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यालयात दोन वेळा जीवे मारण्याची धमकी देऊन खंडणी मागणाऱ्या जयेश पुजारी उर्फ शाकीरचे संबंध एक नव्हे तर अनेक प्रतिबंधित संघटनांशी होते. तो देश विघातक कारवायांमध्ये गुंतलेल्या अनेकांशी संपर्कात होता. धक्कादायक बाब म्हणजे देश विघातक कामांमध्ये सक्रिय असणाऱ्या लोकांशी त्याचे हे संपर्क बेळगाव जेलमध्ये येण्याच्या पूर्वीपासून होते. बेळगावच्या जेलमधूनही तो त्यांच्या संपर्कात असल्याची माहिती पोलीस आयुक्तांनी दिली आहे.

जयेश उर्फ शाकीर सातत्याने पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या प्रतिबंधित संघटनेसह लश्कर-ए-तोयबा आणि दाऊद इब्राहिमशी संबंधित लोकांशी संपर्कात असल्याचे पुरावे तपासात मिळाले असल्याची माहितीही पोलीस आयुक्तांनी दिली. या संपूर्ण प्रकरणाचे काही धागे दोरे देशाच्या सीमेपलीकडे ही जात आहे आणि त्यानुषंगाने एनआय या प्रकरणाचा तपास करणार आहे.