आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्तुतीसुमने:आगामी निवडणुकीत नितीन गडकरींना इतकी मते मिळाली पाहिजे की मोजणारेसुद्धा पागल व्हावेत- चंद्रशेखर बावनकुळे

नागपूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मतांसाठी यापुढे कोणाला लोणी लावणार नाही, असे वक्तव्य काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले होते. तसेच, नितीन गडकरींनी वेळोवेळी राजकारणातून निवृत्त होण्याचे संकेतही दिले आहेत. असे असले तरी पुढील लोकसभा निवडणुकीत नितीन गडकरींना विक्रमी मतांनी विजयी करण्यासाठी महाराष्ट्र भाजपने कंबर कसल्याचे दिसत आहे.

गडकरींना आता मते मागावी लागणार नाही

आज नागपूरमध्ये एका कार्यक्रमात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नितीन गडकरींवर स्तुतीसुमने उधळली. बावनकुळे म्हणाले की, नितीन गडकरींमुळे नागपूरला जागतिक पातळीवर स्थान मिळाले आहे. गडकरींनी एवढं काम केले आहे की, त्यांना आता मते मागावीच लागणार नाहीत. पण, राजकारणात मतं मागावी लागतात. आता आपल्या सर्वांची जबाबदारी असून गडकरी यांना सात लाखांपेक्षा जास्त न भूतो ना भविष्यती इतके मते मिळाली पाहिजेत. त्यांना मिळालेली मते मोजणाराही पागल झाला पाहिजे.

नागपूर शहरातील एका उड्डाणपुलाच्या बांधकामाचे भूमिपूजन आज नितीन गडकरी व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. त्या कार्यक्रमात बावनकुळे बोलत होते.

आगामी निवडणुकीत 7 लाख मतांनी विजय निश्चित

बावनकुळे म्हणाले की, नितीन गडकरी यांना आगामी निवडणुकीत मते मागण्याची गरजच पडणार नाही. आगामी निवडणुकीत गडकरी यांचा विजय सात लाख मतांनी झाल्याशिवाय राहणार नाही, इतके चांगले काम गडकरींनी केले आहे. आधीच्या निवडणुकीत नागपूरकरांनी नितीन गडकरी यांना दिलेले एक एक मत किती कामाचे आहे, हे गडकरी यांनी केलेल्या कामातून दिसून येत आहे. गडकरींमुळे नागपूरला जागतिक पातळीवर स्थान मिळाले आहे. गडकरींचा एक वर्षाचा, तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दीड वर्षांचा कालावधी शिल्लक आहे. या कालावधीत उर्वरीत कामे पूर्ण होतील.

माझाही थोडा अधिकार

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, नागपूरसाठी राज्य सरकारकडून 1200 कोटी रुपये आले आहेत. नागपूर शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी 2700 कोटींच्या निधीला मंजुरी देण्यात आली आहे. नितीनजी, तुम्हाला सर्वांनीच काहीतरी मागितले आहे. मीही त्यातून सुटणार नाही, मीही विधान परिषदेचा सदस्यआहे, त्यामुळे माझाही थोडा अधिकार आहे. नागपूर शहरातील उड्डाणपूल ज्या ठिकाणी संपतो, तो रस्ता चांगला झाला पाहिजे.