आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाळकरी मुलांमधूनच भविष्यातील उत्तम वैज्ञानिक घडतील:अपूर्व विज्ञान मेळ्याच्या समारोप प्रसंगी नितीन गडकरी यांची अपेक्षा

नागपूर11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

विज्ञान मेळ्यामुळे मनपाच्या शाळांमधून शिकणाऱ्या गरीब विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित होण्यास मदत होईल असे सांगतानाच या आयोजनातून प्रेरणा घेऊन भविष्यातील उत्तम वैज्ञानिक या शाळकरी मुलांमधील घडतील, असा विश्वास केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला. गडकरी यांनी व्हिडिओ संदेशातून अपूर्व विज्ञान मेळ्याच्या रौप्य महोत्सवी आयोजनानिमित्त आयोजकांना व उपस्थित मान्यवरांना शुभेच्छा दिल्या.

असोसिशन फॉर रिसर्च अँड ट्रेनिंग इन बेसिक सायन्स एज्युकेशन, नागपूर (एआरटीबीएसई) व नागपूर महानगरपालिका, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित चार दिवसीय ( १६ ते २० नोव्हेंबर २०२२ ) २५ व्या रौप्य महोत्सवी अपूर्व विज्ञान मेळ्याचा समारोप रविवारी झाला. राष्ट्रभाषा भवन येथे आयोजित कार्यक्रमाला विज्ञान प्रसारचे संचालक डॉ. नकुल पाराशर, एसओए विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. अमित बॅनर्जी, एआरटीबीएसईचे अध्यक्ष रघू ठाकूर, कार्याध्यक्ष राजाराम शुक्ल, ब्रम्हानंद स्वाइन तसेच सचिव सुरेश अग्रवाल उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि स्वागतपर भाषण ज्योती मेडपिलवार यांनी केले. त्यानंतर एआरटीबीएसईचे सचिव सुरेश अग्रवाल यांनी आपल्या निवेदनात अपूर्व विज्ञान मेळ्याच्या गत २५ वर्षांच्या आठवणी आणि प्रवासाला उजाळा दिला. यावेळी त्यांनी विज्ञानाच्या क्षेत्रातील नव्या प्रयोगांची सुरुवात तसेच या प्रवासा दरम्यान जोडलेल्या विविध व्यक्ती यांचे स्मरण केले व त्यांना सन्मानित केले. यात रघुदीप सिंग, सुषमा सुर्जन, जे. एलएम गायत्री, संध्या वर्मा, व्ही. एस. एस. शास्त्री, राजेश पाराशर, संजय देशभ्रतार, ललित कुंभारे, चंद्रशेखर बांगीलवार, निखिलेश हरी आदींचा समावेश होता.

तसेच शालेय शिक्षणाला अधिक मनोरंजक, सोप्‍या प्रयोगांवर आधारित करण्‍याच्‍या अभियानात सक्रिय आलेल्‍या देशभरातून आलेल्या ४० विज्ञान संचारकांचा देखील यावेळी सत्‍कार करण्यात आला. यामध्ये गोवा, उत्‍तराखंड, उत्‍तरकाशी, बिहार, मध्‍य प्रदेश, उत्‍तर प्रदेश, महाराष्‍ट्र, जम्‍मू कश्‍मीर, कर्नाटक, झारखंड, छत्तीसगढ, जम्मू काश्मीर अशा एकूण १४ राज्यांतील विज्ञान संचारकांचा त्‍यात समावेश आहे.

गांधींच्या विचारांचे अवतरण असलेला विज्ञानाचा प्रयोगांचा हा अपूर्व मेळा आहे. विज्ञान आणि अवैज्ञानिक विचार यांच्यातील संघर्ष कमी व्हायला हवा, असे मत एआरटीबीएसईचे अध्यक्ष राघू ठाकूर यांनी आपल्या भाषणात व्यक्त केले. विज्ञान, वैज्ञानिक आणि त्यापासून लाभ पोहोचणारा समाज यांना जोडण्याचे काम अपूर्व विज्ञान मेळ्याने केले आहे, असे प्रतिपादन "विज्ञान प्रसार' या केंद्र शासनाच्या संस्थेचे संचालक डॉ. नकुल पाराशर यांनी केले.

डॉ. कपिल त्रिपाठी यांनी केवळ साडेतीन वर्षांत विज्ञानावर आधारित ४००० रंजक माहिती देणाऱ्या फिल्म्स/व्हिडिओची निर्मिती केली.

बातम्या आणखी आहेत...