आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

थॅलेसेमियाग्रस्त बालिकेवर बोन मेरो ट्रान्सप्लांटेशन यशस्वी:गडकरींच्या सहकार्यांमुळे वाचले प्राण; सीएसआर निधीतून मिळाले 10 लाख

नागपूर6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोल इंडिया लिमिटेडद्वारा सीएसआर निधीतून थॅलेसेमियापीडित रुग्णांना बोन मेरो ट्रान्सप्लांटेशन प्रक्रियेसाठी 10 लाखांची मदत करण्याची घोषणा करण्यात आली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रयत्नांमुळे ही मदत शक्य झाली. त्यामुळे थॅलेसेमियाग्रस्त बालिकेवर बोन मेरो ट्रान्सप्लांटेशनची शस्रक्रिया अडथळ्याशिवाय पार पडली आणि या मुलीला जीवदान मिळाले.

गडकरींप्रती व्यक्त झाली कृतज्ञता

नागपूरची नंदिनी ही बालिका या योजनेतून बोन मॅरो ट्रान्सप्लांटेशन प्रक्रियेसाठी पहिली लाभार्थी ठरली. या बालिकेने नुकतीच गडकरी यांची भेट घेतली व कृतज्ञता व्यक्त केली. थॅलेसेमिया व सिकलसेल सोसायटीचे अध्यक्ष डॉ. विंकी रुघवानी यांनी गडकरींना एक निवेदन दिले होते. तसेच थॅलेसेमिया रुग्णांना बोन मॅरो ट्रान्सप्लांटेशन करण्यासाठी लागणारी रक्कम खूप जास्त असल्यामुळे रुग्ण हा खर्च करू शकत नाही. बोन मॅरो ट्रान्सप्लांटेशन हा एकमेव उपाय या रुग्णांसाठी आहे. तेव्हा मदत करण्याची विनंती डाॅ. रूघवानी यांनी केली होती.

दरम्यान गडकरी यांनी पंतप्रधान कार्यालय व आरोग्य मंत्रालयाला विनंती करून या प्रक्रियेसाठी लागणारा खर्च सीएसआर निधीतून करण्यात यावा अशी शिफारस केली. गडकरी यांच्या प्रयत्नांमुळे कोल इंडियाने सीएसआर अंतर्गत कोकिलाबेन अंबानी हॉस्पिटल मुंबईची निवड केली. या हॉस्पिटलमध्ये बोन मॅरो ट्रान्सप्लांटेशन करण्यात येत आहे. येथे बोन मॅरोची प्रक्रिया करणाऱ्या रुग्णांना सीएसआरमधून 10 लाखांची मदत दिली जाणार आहे.

नागपूरची नंदिनी ही बालिका या योजनेतून बोन मॅरो ट्रान्सप्लांटेशन प्रक्रियेसाठी पहिली लाभार्थी ठरली आहे. या उपक्रमामुळे थॅलेसिमियाग्रस्त रुग्णांना जीवदान मिळणार आहे.

बातम्या आणखी आहेत...