आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दु:ख पचवून दिली होती परीक्षा:घरात वडिलांचा मृतदेह ठेवून नितीनने दिली होती परीक्षा, आज 71.60 टक्के गुण घेऊन तो उत्तीर्ण

नागपूर9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दहावीच्या परीक्षेच्या दुसऱ्या दिवशी सकाळी परीक्षेला निघण्याच्या तयारीत असतानाच हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने त्याचे वडील गेले. हृदयाचे गहिवर डोळ्यात साठवून परीक्षेला जात त्याने पेपर दिला. शुक्रवारी निकाल जाहीर झाला तेव्हा ७१.६० टक्के गुण घेऊन तो उत्तीर्ण झाला होता. शंकरनगरमधील कर्णबधिर शाळेचा विद्यार्थी नितीन ठाकरेचे हे बोलके यश अनेकांना प्रेरक ठरले.

घरात वडिलांचा मृतदेह असतानाही खचून न जाता, कुठेही विचलित न होत नितीनने परीक्षा दिली. मूकबधिर असला तरी त्याला चांगले शिक्षण देण्याचा संकल्प त्याच्या वडिलांनी केला हाेता. नितीनही नियमित अभ्यास करायचा. दहावीचे वर्ष होते. कोरोनाकाळात शाळा बंद होत्या, मात्र ऑनलाइन शिक्षण सुरू होते. नितीन प्रत्येक वर्ग नियमित करायचा. दहावीची परीक्षा सुरू झाली. पहिला पेपर झाला आणि दुसऱ्याच पेपरच्या दिवशी वडिलांवर काळाने घाला घातला. त्यांचे हृदयविकाराने निधन झाले. अशा वेळी घरच्यांना धीर द्यावा की परीक्षेला जावे? अशा द्विधा मनःस्थितीत ताे होता. त्यात वडिलांचे असे अचानक जाणे त्याच्या मनावर आघात करून गेले.

दु:ख पचवून दिली परीक्षा
दरम्यान, शाळेतील शिक्षकांना ही बातमी कळताच त्यांनी तातडीने नितीनशी संपर्क साधून त्याला धीर दिला. वर्ष वाया जायला नको म्हणून त्याला परीक्षा देण्यास सांगितले. घरी वडिलांचे पार्थिव ठेवलेले, त्यामुळे नितीनचा पाय घराबाहेर पडत नव्हता. पण दु:ख पचवून नितीनने परीक्षा दिली.

बातम्या आणखी आहेत...