आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरात वडिलांचा मृतदेह ठेवून दिली दहावीची परीक्षा:आसवं डोळ्यात गोठवून परीक्षा देणाऱ्या मूकबधीर नितीनचे बोलके यश

नागपूर12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दहावीच्या परीक्षेच्या दुसऱ्या दिवशी सकाळी परीक्षेला निघण्याच्या तयारीत असतानाच हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने त्याचे वडील गेले. हृदयाचा गहीवर डोळ्यात साठवून त्याने परीक्षा दिली. शुक्रवारी निकाल जाहीर झाला तेव्हा 71.60 टक्के गुण घेऊन तो उत्तीर्ण झाला. शंकर नगरमधील मूकबधीर शाळेचा विद्यार्थी नितीन ठाकरेचे हे बोलके यश अनेकांना प्रेरक ठरले असेच आहे.

वडीलांच्या मृत्यूनंतर खचला नाही

घरात वडीलांचा मृतदेह असतानाही खचून न जाता कुठेही विचलित न होत नितीनने परीक्षा दिली. मूकबधिर असला तरी त्याला चांगले शिक्षण देण्याचा संकल्प त्याच्या वडिलांनी केला. नितीनही नियमित अभ्यास करायचा. दहावीचे वर्ष होते. कोरोना काळात शाळा बंद होत्या. मात्र ऑनलाईन शिक्षण सुरू होते. नितीन प्रत्येक वर्ग नियमित करायचा. दहावीची परीक्षा सुरू झाली. पहिला पेपर झाला आणि दुसऱ्याच पेपरच्या दिवशी वडिलांवर काळाने घाला घातला. त्यांचे हृदयविकाराने निधन झाले. अशावेळी घरच्यांना धीर द्यावा की परीक्षेला जावे? अशा द्विधा मनस्थितीत नितीन होता. त्यात वडिलांचे असे अचानक जाणे त्यांच्या मनावर आघात करून गेले.

दुःख पचवून दिली परीक्षा

नितीनच्या वडीलांच्या निधनाची बातमी शाळेतील शिक्षकांना कळताच त्यांनी तातडीने नितीनशी संपर्क साधून त्याला धीर दिला. वर्ष वाया जायला नको म्हणून त्याला परीक्षा देण्यास सांगितले. घरी वडिलांचे पार्थिव ठेवलेले, त्यामुळे नितीनचा पाय घराबाहेर पडत नव्हता. पण दु:ख पचवून नितीनने परीक्षा दिली. तो 71.60 टक्के गुणांनी उत्तीर्ण झाला. यासाठी त्याने केलेल्या संघर्षाचे सोने झाले. त्याने या यशाचे श्रेय शाळेच्या प्राचार्या डॉ. मीनल सांगोळे आणि शिक्षकांसह धीर देणाऱ्या प्रत्येकाला दिले.

बातम्या आणखी आहेत...