आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाना पटोलेंचा दावा:भाजपने कितीही घोडेबाजार केला, तरी महाविकास आघाडीचेच उमेदवार जिंकणार

नागपूर25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय जनता पक्षाने कितीही घोडेबाजार केला वा केंद्रीय तपास यंत्रणांचा कितीही दुरुपयोग केला, तरी त्याचा काहीही परिणाम होणार नाही. राज्यसभा निवडणुकीत चारही उमेदवार महाविकास आघाडीचेच निवडून येतील, असा विश्वास काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नागपूर येथे माध्यमांशी बोलताना व्यक्त केला.

नाईलाज म्हणून प्रवक्त्यांचे निलंबन

जगभरातून विशेषत: मुस्लिम देशांतून निषेध व्हायला लागल्यावर आणि भारतीय वस्तूंवर बहिष्काराचे आवाहन व्हायला लागल्यानंतर भाजपाने नाईलाजाने दोन प्रवक्त्यांचे निलंबन केल्याचा आरोप पटोले यांनी केला. भाजप संविधानाला न मानणारी आहे, हे आम्ही वारंवार सांगितले आहे. संविधानाने व्यक्ती स्वातंत्र्य दिले असले तरी दुसऱ्याच्या धर्मावर टीका करण्याचा अधिकारी दिलेला नाही. केवळ भाजपामुळे जागतिक स्तरावर भारताची मान खाली गेली आहे.

काश्मिरी पंडिताची माफी मागा

सत्तेत आल्यावर आम्ही 370 हटवू असे भाजपा सांगत होती. मात्र, हे कलम हटविल्यावर आज तिथली परिस्थिती वाईट आहे. काश्मिरी पंडितांची हत्या होत आहे. अजूनही तिथे राष्ट्रपती राजवट असून तिथे निवडणुका घेऊ शकत नाही. काश्मिरी पंडितांच्या जीवावर राजकारण करुन पोळ्या शेकणारी भाजपा त्यांचे संरक्षण करू शकत नाही, अशी टीका पटोले यांनी केली. नरेंद्र मोदी यांनी काश्मिरी पंडितांची माफी मागावी, असे आवाहन पटोले यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...