आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मी उद्धव ठाकरेंचा मावळा:माझे कोणी वाकडे करू शकत नाही, शिवसेना आमदार नितीन देशमुख यांची ग्वाही

नागपूर4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा मावळा आहे. माझे कोणी काही वाकडे करू शकत नाही, असा विश्वास अकोल्याचे शिवसेना आमदार नितीन देशमुख यांनी नागपूर येथे माध्यमांशी बोलताना व्यक्त केला. देशमुख बुधवारी दुपारी गुजरातहून नागपुरला आले. व अकोल्याला रवाना झाले. तत्पूर्वी ते बोलत होते.

मला ना हार्ट अटॅक आला होता ना काही झाले होते. मी हाॅटेलबाहेर उभा असताना गुजरात पोलिस मला जबरदस्तीने उचलून हाॅस्पिटलला घेऊन गेले. तिथे माझ्या दंडात जबरदस्तीने इंजेक्शन टोचले. पण, मला काहीही झालेले नसून मी एकदम ठणठणीत आहे. मी उद्धव ठाकरे यांच्यासाेबतच आहो, असे देशमुख यांनी पुन्हा एकवार स्पष्ट केले.

नितीन देशमुख घरी न आल्यामुळे त्यांच्या पत्नीने पोलिस ठाण्यात ते मिसिंग असल्याची तक्रार केली होती. तर सेना नेते संजय राऊत यांनी देशमुख यांना गुजरात पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप केला होता. त्यामुळे देशमुख एकदम चर्चेत आले होते.

बातम्या आणखी आहेत...