आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नागपूर:घातपात नव्हे, श्वास गुदमरल्यानेच झाला डॉ. शीतल आमटे यांचा मृत्यू, आत्महत्येसाठी वापरलेले विष अत्यंत घातक

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • महिना उलटला : पोलिसांच्या तपासात अजूनही म्हणावी तशी प्रगती नाही

कर्मयोगी बाबा आमटे यांची नात, डाॅ. विकास आमटे यांची कन्या आणि महारोगी सेवा समितीच्या सीईओ डाॅ. शीतल आमटे-करजगी यांच्या आत्महत्येला महिना होऊनही पोलिस तपासात अजूनही म्हणावी तशी प्रगती नाही. चंद्रपूरचे पोलिस अधीक्षक अरविंद साळवे यांनी बुधवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत डॉ. शीतल यांचा मृत्यू श्वास गुदमरून झाल्याचा प्राथमिक अहवालातील निष्कर्ष उघड करत त्यांच्या मृत्यूमागे घातपात तर नाही ना, अशा चर्चांना विराम दिला.

साळवे यांनी डॉ. शीतल आमटे-करजगी यांच्या मृत्यूबाबत अनेक खुलासे केले. मात्र, यात पोलिसांनी कोणताही निष्कर्ष काढलेला नाही. जून २०२० मध्ये डॉ. शीतल यांनी झोपेच्या गोळ्या घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता, अशी नवी माहिती साळवे यांनी दिली. व्हिसेरा आणि अन्य काही गोष्टी अजूनही तपासासाठी प्रयोगशाळेत राखून ठेवल्याची माहिती देण्यात आली. डॉ. शीतल यांचा मृत्यू घातपात नसल्याची माहिती साळवे यांनी दिली. या वेळी घटनास्थळी कुठलीही सुसाइड नोट नसल्याचा खुलासा करण्यात आला आहे. डॉ. शीतल यांच्या मृत्यूबाबत महत्त्वाचा खुलासा करू शकणारे त्यांचे टॅब-मोबाइल-लॅपटॉप यांचा मुंबई प्रयोगशाळेचा अहवाल अद्याप प्रलंबित आहे. डॉ. शीतल यांनी कुत्र्यांना देण्यासाठी नागपूरमधील फार्मासिस्टकडून इंजेक्शन्स मागवली होती. ही इंजेक्शन्स अ‍ॅनेस्थेशिया श्रेणीतील आहेत. शीतल यांनी मागवलेल्या पाच इंजेक्शन्सपैकी एक शीतल यांच्या मृतदेहाजवळ तुटलेल्या अवस्थेत मिळालेले होते, असे यापूर्वी समोर आले होते. टॅब-मोबाइल-लॅपटॉप यांचा अहवाल प्रलंबित आहे. त्याशिवाय व्हिसेरा आणि अन्य काही गोष्टी अजूनही तपासासाठी प्रयोगशाळेत आहेत. विविध अहवाल प्रतीक्षेत असल्याने मृत्यूबाबत निष्कर्ष काढणे शक्य नसल्याची माहिती पोलिसांनी दिली.

आत्महत्येसाठी वापरलेले विष अत्यंत घातक
शीतल आमटे यांनी आत्महत्येसाठी वापरलेली काही इंजेक्शन्स त्यांच्या कक्षात आढळून आली. शीतल यांनी आत्महत्येसाठी नेमके कोणते विषारी रसायन वापरले याचा तपास पोलिस करत आहेत. याबाबतचा रासायनिक अहवाल आल्यानंतरच हे स्पष्ट होणार आहे. दरम्यान, डॉ. शीतल यांनी आत्महत्येसाठी वापरलेले विष हे अत्यंत घातक आणि उच्च गुणवत्तेचे असल्याची सूत्रांची माहिती आहे. हे विष त्यांनी कुठून मिळवले याचा तपास करण्याचे पोलिसांपुढे आव्हान आहे.

बातम्या आणखी आहेत...