आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
गुरूवार, 14 रोजी संक्रांतीला नागपुरच्या आकाशात उत्साहात पतंगबाजी झाली. घरोघरी मुलांनी गच्चीवर जाऊन दिवसभर पतंगबाजी केली. ‘ओssकाट’च्या घोषणांनी आकाश दणाणून गेले होते. यात अनेक पक्षी जखमी झाले. मांजाने त्यांचे पंख कापल्या गेले होते. या जखमी पक्ष्यांवर ट्रान्झिट ट्रिटमेंट सेन्टरवर उपचार करण्यात आले. संक्रांतीला सेंटर 24 तास सुरू होते. ज्या पंखाच्या भरवश्यावर आकाशात उंच भरारी घेऊ शकतात, त्यावरच मांजची कुऱ्हाड चालली. आनंद साजरा करा पण, नायलॉन मांजा वापरू नका, असे आवाहन सेंटरने केले आहे. दरम्यान, या मांजा संदर्भात उच्च न्यायालयाने पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिवांना नोटीस पाठवली आहे.
बंदी घालण्यात आलेल्या नॉयलॉन मांजाच्या सर्रास वापराबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिवांना नोटीस बजावली आहे. येत्या दोन आठवड्यात या नोटीस वर पर्यावरण विभागाला नागपुर खंडपीठात उत्तर दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. नॉयलॉन मांजा संदर्भात या पूर्वी देण्यात आलेल्या दिशा निर्देशांचे पालन होत नसल्याने न्यायालयाने स्वतः च जनहित याचिका दाखल करून राज्याच्या पर्यावरण विभागाला ही नोटीस बजावली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी नायलॉन मांजाच्या घातक परिणामांची गंभीर दखल घेऊन यासंदर्भात आवश्यक आदेश देण्याकरिता स्वत:च जनहित याचिका दाखल करून घेतली होती. या याचिकेवर गुरुवारी सुनावणी करण्यात आली आहे. याचिकेचे कामकाज पाहण्यासाठी ॲड. देवेंद्र चव्हाण यांची न्यायालय मित्र म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
मांजामुळे तरुणाने गमावला प्राण
प्रणय प्रकाश ठाकरे (21) या तरुणाचा मंगळवारी(दि. 12) इमामवाडा परिसरात नायलॉन मांजाने गळा कापून वेदनादायी मृत्यू झाला. या घटनेनंतर काही वेळातच मानेवाडा येथे सौरभ पाटणकर (22) हा तरुण नायलॉन मांजाने गळा कापण्यापासून थोडक्यात बचावला. त्याने वेळीच गळ्यापुढे हात धरला. त्यामुळे केवळ त्याच्या हाताला इजा झाली. तसेच, डिसेंबरमध्ये झिंगाबाई टाकळी येथे एका तरुणाचा नायलॉन मांजाने गळा चिरला गेला. नायलॉन मांजामुळे यावर्षी अशा अनेक घटना घडल्या. नायलॉन मांजा पशुपक्ष्यांसाठीही घातक ठरत आहे. नायलॉन मांजामुळे असंख्य पक्षी मृत्युमुखी पडले व गंभीर जखमी झाले आहेत. हा मांजा पशूंनाही इजा पोहचवत आहे.राज्यात नायलॉन मांजा खरेदी-विक्री व वापरावर बंदी आहे. परंतु, काही व्यापारी पैशाच्या लालसेपोटी लपूनचोरून नायलॉन मांजाची विक्री करतात. यामुळे बंदी घालण्यात आल्यानंतरही नॉयलॉन मांजाची सर्रास विक्री सुरू आहे. याचीच दखल घेऊन न्यायालयाने ही नोटीस बजावली आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.