आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानागपूर येथे 19 डिसेंबरपासून होणाऱ्या हिवाळी अधिवेशनासाठी लिपिक, टंकलेखक आणि शिपाई व संदेशवाहकांची तात्पुरती व पूर्णतः हंगामी स्वरूपात पदे भरण्यात येणार आहेत. या पदांसाठी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. लिपीक - टंकलेखकाची एकूण 10 पदे आणि शिपाई व संदेश वाहकांची एकूण 24 पदे भरण्यात येणार आहे.
येत्या 19 डिसेंबरपासून नागपूर येथे हिवाळी अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. दोन आठवड्याच्या या अधिवेशनासाठी मोठ्या संख्येने मनुष्यबळाची आवश्यकता भासते. त्यासाठी तात्पुरती अस्थायी भरती केली जात आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशन तीन आठवड्यांचे होईल असे सांगितले होते. मात्र कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत ठरल्यानुसार सध्या तरी दोन आठवड्यांचा कार्यक्रम आहे.
लिपीक-टंकलेखक या पदाकरिता शैक्षणिक अर्हता बारावी उत्तीर्ण, मराठी टंकलेखन 30 शब्द प्रति मिनिट व इंग्रजी टंकलेखक 40 शब्द प्रति मिनिट व संगणकाची एमएससीआयटी किंवा इतर समकक्ष संगणक परीक्षा उत्तीर्ण, वयाची अट खुला संवर्गासाठी 18 ते 38 वर्षे, मागास वर्गासाठी वय 18 ते 43 वर्षे (5 वर्ष नियमाप्रमाणे शिथीलक्षम) शिपाई, संदेश वाहकासाठी शैक्षणिक अर्हता चौथा वर्ग उत्तीर्ण किंवा उच्च अर्हता, वयाची अट खुल्या संवर्गासाठी वय 18 ते 38 वर्षे, मागास वर्गासाठी 18 ते 43 वर्षे ( 5 वर्षे नियमाप्रमाणे शिथीलक्षम) तसेच सायकल चालविता येणे आवश्यक आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी दिनांक 4 ते 24 नोव्हेंबरपर्यंत अर्ज करावे. विहित कालावधीनंतर प्राप्त झालेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत.
सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, प्रशासकीय इमारत क्र. 2, २ रा माळा, सिव्हिल लाईन्स, नागपूर 440001 येथे हे अर्ज स्वीकारण्यात येतील. कार्यालयाचा दूरध्वनी क्र. 0712-2531213 असा आहे. इच्छुक उमेदवारांनी कार्यालयात अर्जाचा नमुना घेण्यासाठी येताना सोबत फोटो तसेच इतर शैक्षणिक व आवश्यक कागदपत्रे सोबत आणावी. अर्जाचा विहित नमुना कार्यालयात विनामूल्य उपलब्ध असल्याचे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्तांनी कळवले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.